ETV Bharat / city

आयडीबीआय बँकेची 31 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'एजीआयएल'वर संचालकांवर गुन्हा दाखल

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर आयडीबीआय ( IDBI Bank ) बँकेचे 31 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याप्रकरणी प्रथम कफ परेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने शुक्रवारी (दि. 17 जून ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
author img

By

Published : Jun 19, 2022, 8:20 AM IST

मुंबई - मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर आयडीबीआय बँकेचे ( IDBI Bank ) 31 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याप्रकरणी प्रथम कफ परेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने शुक्रवारी (दि. 17 जून ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराफ कंपनीने बँकेकडून कर्ज घेतले होते. पण, कर्ज कराराच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून इतर कारणांसाठी निधी वळवला आहे. आयडीबीआयचे व्यवस्थापक संजीव कुमार सतपाल यांच्या तक्रारीवरून ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड ( AGIL )चे संचालक दिवंगत अमृतलाल गुलाबचंद जैन, रितेश अमृतलाल जैन आणि कंपनीचे सीएफओ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर फौजदारी विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रथम कफ परेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग 2 कक्षाकडे वर्ग केला आहे. सध्या तक्रारदार बँकेकडून कागदपत्रे मागवली आहेत. त्याआधारे रक्कम कोठे वळवण्यात आली. याचा शोध घेण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रकरण काय ? - ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2011 व 2014 मध्ये आयडीबीआय बँकेकडून कंपनीच्या व्यवसायासाठी वर्किंग कॅपिटल म्हणून 30 कोटी रुपये व ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणून एक कोटी 29 लाख रुपये कर्ज घेतले होते. आरोपींनी संगनमत करून कर्ज रकमेचा वापर अटींप्रमाणे केला नाही. याशिवाय आर्थिक वर्षे 2012-13 व 2013-14 च्या दरम्यान कर्जाची रक्कम इतरत्र वळती केली. ही रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आली. बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला सादर करण्यात आले. याप्रकरणी कंपनीच्या व्यवहाराशी संबंधित नसलेल्या कंपन्यांसोबत व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे आयडीबीआय बँकेचे कर्ज रक्कम 31 कोटी 29 लाख रुपये न फेडता अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Rahul Gandhi defamation case: मानहानी खटल्याप्रकरणी राहुल गांधींना गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.