ETV Bharat / city

INS Vikrant Fund Fraud : 'महात्मा सोमय्या, ये बता पैसा किधर गया?'.. आयएनएस विक्रांतवरून संजय राऊत आक्रमक - FIR On Kirit Somaiya Nil Somaiya

मी तर ५८ कोटी म्हणालो होतो पण, प्रकरण १४० कोटींपर्यंत गेलंय. महात्मा सोमैया, इधर उधर की बात मत कर. सिर्फ येही बता.. save vikrant के लिये जमा किया पैसा ( INS Vikrant Fund Fraud ) गया किधर? असा सवाल उपस्थित करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला ( Sanjay Raut Criticized Kirit Somaiya ) आहे. युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे गोळा करून त्याचा गैरव्यवहार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Apr 8, 2022, 3:10 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले ( Sanjay Raut Vs Kirit Somaiya ) आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या प्रकरणात त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर 58 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप राऊत यांनी केला ( INS Vikrant Fund Fraud ) आहे. मुंबई पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रावर एफआयआरही ( FIR On Kirit Somaiya Nil Somaiya ) नोंदवला आहे. याच प्रकरणी राऊत यांनी सोमय्या यांच्या जुन्या ट्विटचा संदर्भ देत हा गैरव्यवहार ५८ नाही तर १४० कोटींचा असल्याचे ट्विट केले ( Sanjay Raut Criticized Kirit Somaiya ) आहे.

किरीट सोमय्या निरुत्तर : याचपार्श्वभूमीवर अडचणी वाढत असल्याचे लक्षात येताच भाजप नेते किरीट सोमय्या आज दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत पोहोचताच किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आयएनएस विक्रांत वाचवण्याची मोहीम बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. 58 कोटी डब्यांमध्ये ठेवता येतील का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. हा केवळ मला गोवण्याचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. पत्रकारांनी त्यांना आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या मोहिमेत देणगी म्हणून किती रक्कम जमा झाली आणि ती रक्कम कोणाला देण्यात आली? यावर प्रश्न विचारला असता ते उत्तर न देताच निघून गेले.

  • महात्मा सोमैया
    इधर उधर की बात मत कर.
    सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया .मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही?
    नौटंकी बंद करो..
    आंकडे का खेल बाद में खेलेंगे.it's the matter of police investigation.
    समझा क्या? pic.twitter.com/U4zmc5iFxl

    — Sanjay Raut (@rautsanjay61) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप नेत्याचेही ट्विट व्हायरल : भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत भेटीचा फोटो ट्विट केला आहे. ट्विटनुसार, आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय राऊतही होते. यासह गोपीनाथ मुंडे, अनंत गीते पाटील, अनिल देसाई यांचाही त्या शिष्टमंडळात समावेश होता.

राऊत यांनी पुन्हा केला हल्ला : संजय राऊत यांनी ट्विट करत किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे कुठे गेले ते सांगा असा सवाल त्यांनी महात्मा सोमय्या यांना विचारला आहे. त्यांनी ट्विट केले, "महात्मा सोमय्या... इकडे तिकडे बोलू नका. फक्त एवढेच सांगा.. विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे कुठे गेले... हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे. तुम्हाला समजले का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.