ETV Bharat / city

शनिवारी मुंबईतील शाळांमध्ये राहणार शुकशुकाट ! - convention of Teachers Council

एकाच दिवशी शिक्षक भारती आणि शिक्षक परिषदेचे अधिवेशन असल्याने शनिवारी मुंबईतील शाळांमध्ये शुकशुकाट पहायला मिळणार आहे.

मुंबई शाळा बंद
मुंबईतील शाळांमध्ये शुकशुकाट
author img

By

Published : Feb 8, 2020, 3:22 AM IST

मुंबई - दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाच उद्या (शनिवारी) मुंबईतील सर्व शाळांमध्ये शुकशुकाट निर्माण होणार आहे. भाजप प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती, या दोन्ही संघटनांची अधिवेशने मुंबईत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने शेकडो शिक्षकांनी अर्जित रजा टाकली आहे. त्यामुळे शिक्षक शाळांमध्ये गैरहजर राहणार असल्याने मुंबई अणि परिसरातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट निर्माण होणार आहे.

एकाच दिवशी शिक्षक भारती आणि शिक्षक परिषदेचे अधिवेशन... शनिवारी मुंबईतील शाळांमध्ये राहणार शुकशुकाट !

हेही वाचा... महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री

शिक्षक भारती आणि शिक्षक परिषदेच्या या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना अर्जित रजा देण्यासाठी दोन्हीही संघटनांनी शिक्षण विभागाकडून मागणी मान्य करून घेतली असल्याचे सांगण्यात येते. दोन्हीही संघटनांनी आपल्या अधिवेशनाला सर्वाधिक शिक्षक कसे उपस्थित राहतील, यासाठी मोर्चेबांधणी केली असल्याने मुंबईत उद्या मोठ्या प्रमाणात शिक्षक दोन्ही अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दहावी-बारावीच्या परीक्षा या तोंडावर आल्या असल्याने अशा प्रकारे‍ अधिवेशने आयोजित करून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा... पाणीपुरीचा ठेला ते रेस्टॉरंट... वाचा बांद्रातील 'एल्को रेस्टॉरंट'ची यशोगाथा

शिक्षक भारतीचे अधिवेशन उद्या शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी वडाळा येथील नायगाव क्रॉस रोडजवळ असलेल्या मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे भारतीय क्रीडा मंदिर स्टेडियम येथे होत आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदी नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा शिक्षक भारतीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपप्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आपले मुंबई विभागाचे अधिवेशन हे माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात होत आहे. या अधिवेशनाला माजी शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, शिक्षक आमदार नागो गाणार आदी उपस्थित राहणार आहेत.

Intro:उद्या मुंबईतील शाळांमध्ये राहणार शुकशुकाट, एकाच दिवशी शिक्षक भारती अन् शिक्षक परिषदेचे अधिवेशने

mh-mum-01-schooloff-adhiveshan-7201153

मुंबई, ता. ७ : 
दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाच उद्या मुंबईतील शाळांमध्ये सर्व शुकशुकाट निर्माण होणार आहे. भाजप प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती या दोन्ही संघटनांची अधिवेशने मुंबईत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत.  या अधिवेशनाच्या निमित्ताने शेकडो शिक्षकांनी अर्जित रजा टाकून शाळांमध्ये गैरहजर राहणार असल्याने मुंबई अणि परिसरातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट निर्माण होणार आहे. 
शिक्षक भारती आणि शिक्षक परिषदेच्या या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना अर्जित रजा देण्यासाठी दोन्हीही संघटनांनी शिक्षण विभागाकडून मागणी मान्य करून घेतली असल्याचे सांगण्यात येते. दोन्हीही संघटनांनी आपल्या अधिवेशनाला सर्वाधिक शिक्षक कसे उपस्थित राहतील यासाठी मोर्चेबांधणी केली असल्याने  मुंबईत उद्या मोठ्या प्रमाणात शिक्षक दोन्ही अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दहावी-बारावीच्या परीक्षा या तोंडावर आल्या असल्याने अशा प्रकारे‍ अधिवेशने आयोजित करून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे योग्य नसल्याचे बोलले जात आहे. 
शिक्षक भारतीचे अधिवेशन उद्या शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी वडाळा येथील नायगाव क्रॉस रोड,जवळ असलेल्या मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे भारतीय क्रीडा मंदिर स्टेडियम येथे होत आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते व खा. संजय राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आदी नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा शिक्षक भारतीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपप्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आपले मुंबई विभागाचे अधिवेशन हे माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात होत आहे. या अधिवेशनाला माजी शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, शिक्षक आमदार नागो गाणार आदी उपस्थित राहणार आहेत. 

Body:उद्या मुंबईतील शाळांमध्ये राहणार शुकशुकाट, एकाच दिवशी शिक्षक भारती अन् शिक्षक परिषदेचे अधिवेशने
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.