ETV Bharat / city

राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!

author img

By

Published : May 11, 2021, 8:49 AM IST

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी या कठीण समयी देशाच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. तिने ‘सेव्ह द चिल्ड्रन’, या जागतिक मदत संस्थेसोबत सोबत हातमिळवणी करीत या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे.

१०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!

मुंबई - यावर्षीच्या सुरुवातीला आपण कोरोनावर मात केली, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु फेब्रुवारी-मार्च मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णसंख्या भयावह आहे. त्यातच वैद्यकीय सेवांवर ताण पडला असून, औषधे आणि इस्पितळातील बेड्स यांची कमतरता जाणवू लागली आहे. इतकेच नव्हे तर प्राणवायूची सुद्धा कमी असून काही रुग्णांना ऑक्सिजनअभावी प्राण सोडावे लागले आहेत. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी या कठीण समयी देशासाठी मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कसली कंबर

कोरोनाग्रस्त गंभीर परिस्थितीत अनेकजण दान व देणग्या देत आहेत. ज्यात मनोरंजनसृष्टीतील लोकांचाही समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सुद्धा या कठीण समयी देशासाठी मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. तिने ‘सेव्ह द चिल्ड्रन’, या जागतिक मदतदायी संस्थेसोबत सोबत हातमिळवणी करीत या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कंबर कसली आहे.

रुग्णाला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती मिळेल

‘सेव्ह द चिल्ड्रन’ ही संस्था राजधानी दिल्लीमध्ये एक अस्थायी हॉस्पिटल बांधणार असून त्यामध्ये ऑक्सिजन प्लांटसह १०० बेड्स असतील. या प्रोजेक्टमध्ये रुग्णांना घरी उपचारांसाठी वैद्यकीय किट उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच त्यामध्ये डॉक्टरांशी आणि सायको-सोशल-थेरपिस्ट बरोबर सल्लामसलत करणे, हेदेखील असेल. जेणेकरून रुग्णाला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती मिळेल.

सर्वांना छोटी किंवा मोठी मदत करण्याचे आवाहन

या उपक्रमात हुमाची हॉलिवूड फिल्म ‘आर्मी ऑफ द डेड’ चे दिग्दर्शक जॅक स्नायडरही मदतीसाठी पुढे आले आहेत. तसेच ब्रिटिश अभिनेता आणि रॅपर रिझवान (रिज) अहमदही साथ देत आहे. हुमाच्या या उपक्रमाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद पाहून, भारत आणि परदेशातून, मोठ्या संख्येने लोकांनी या उपक्रमात योगदान द्यावे. तसेच अधिकाधिक रुग्ण या योजनेचा लाभ घेत निरोगी बनावेत अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हुमा कुरेशीने सर्वांना छोटी किंवा मोठी मदत करण्याचे आवाहन केले असून आंतरराष्ट्रीय समुदायालाही यात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा - म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.