ETV Bharat / city

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप; अडीचशे डबेवाल्यांना सायकल वितरित - मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

काही दिवसांपूर्वी एचएसबीसी बँकेने मुंबई डबेवाल्यांसाठी सीएसआर फंडातून पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. यातूनच मुंबई डबेवाल्यांना रेशन, डबेवाल्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी टॅब वाटप आणि नव्या सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत.

Hsbc distributed cycle
Hsbc distributed cycle
author img

By

Published : Oct 24, 2021, 5:54 PM IST

मुंबई - जागतिक महामारी कोरोनाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला होता. यातच हातावर पोट असणारे मुंबईचे डबेवाले देखील भरडले गेले. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर डबेवाल्यांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सायकल एचएसबीसी बँकेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अंधेरी- जोगेश्वरी भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. हा कार्यक्रम आज रविवारी जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या एच के इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी सेंटरच्या पटांगणात पार पडला. पुढील आठवडाभरात संपूर्ण मुंबईतील डबेवाल्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या जातील.

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

एचएसबीसी बँकेचा उपक्रम
कोरोना काळात संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मुंबईच्या डबेवाल्यावर उपासमारीची वेळ आली होती. असंघटित कामगार असणाऱ्या या डबेवाल्यांना विविध एनजीओ आणि कंपन्यांच्या माध्यमातून रेशन किटचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी एचएसबीसी बँकेने मुंबई डबेवाल्यांसाठी सीएसआर फंडातून पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. यातूनच मुंबई डबेवाल्यांना रेशन, डबेवाल्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळावे यासाठी टॅब वाटप आणि नव्या सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय मुंबई डबेवाल्यांना मोबाईलदेखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Hsbc distributed cycle
अडीचशे डबेवाल्यांना सायकल वितरित
विविध एनजीओ आणि कंपन्यांची मदत मुंबईतील काम करणाऱ्या चाकरमान्यांना वेळेवर त्यांचा डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईच्या डबेवाल्यांवर कोरोनामुळे संकट आले होते. गेल्या वर्षी लॉकडाऊननंतर अनेक डबेवाले आपापल्या गावी परतले असून तिथेच काम करत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना मुंबईतील कार्यालय सुरु झाले असले तरी बऱ्याच कार्यालयातील कर्मचारी घरून काम करत आहेत. यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय मंदावला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध एनजीओ आणि कंपन्यांच्या माध्यमातून मदत कार्य करण्यात येत आहे.

हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : 'एसआयटी' चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार - नवाब मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.