मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मुंबईत भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते काही ठिकाणी आमने-सामने देखील आले होते. मात्र, कोरोना काळात सुरू असलेल्या या आंदोलनावर मनसेने टीका केलेली आहे. यावर करोना हृदयसम्राट "गप्प का? अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
सरकार देते केवळ कोरोनाचे कारण
सोमवारी गणेश उत्सव मंडळ आणि दहीहंडी उत्सव मंडळ यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची भीती असल्याचे सांगत आहेत. याही वर्षी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचेही सांगितले. सरकार सण उत्सव साजरे करायला कोरोनाचे कारण देते. मात्र, मंगळवारी शिवसैनिकांनी राज्यभर केलेल्या आंदोलनामुळे सर्वत्र गर्दी झाली. मग आता कोरोना पसरत नाही का असा सवाल सर्वसामान्यांसह विरोधी पक्ष विचारत आहेत.
राज यांनी व्यक्त केली नाराजी
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या बैठकीस राज यांनी या प्रकरणातबाबत नाराजी व्यक्त केली होती. जे काही सुरू आहे ते व्हायला नको होतं, चुकीच्या पद्धतीने सर्व काही होत आहे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.
हेही वाचा - राणेंना अटक : अदखलपात्र गुन्हे दखलपात्र केल्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप