मुंबई - राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार) संध्याकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी 'हाऊ इज जोश' म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
-
How is Josh?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
जय महाराष्ट्र
">How is Josh?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
जय महाराष्ट्रHow is Josh?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
जय महाराष्ट्र
हेही वाचा - महाविकास आघाडीत फक्त १ उपमुख्यमंत्री, 'असा' ठरलाय मंत्रिपदाचा फॉर्म्युला
दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडी अवघ्या देशाने पाहिल्या आहेत. मुख्यमंत्री पदावरून युतीत बिनसल्यांतर शिवसेनेने आघाडी अर्थात काँगेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. यामध्येच अजित पवारांचे बंडाचा खेळही यात पहायला मिळाला होता. अखेर हे बंड थंड करून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत आहेत.
हेही वाचा - पालिकेकडून आर्थिक मदत देऊनही बेस्टच्या तुटीत वाढ, विरोधी पक्ष नेत्यांनी केले आश्चर्य व्यक्त
शिवसेनेची बाजू कायमच भक्कमपणे लावून धरणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मागील काही महिन्यांपासून माध्यमात चर्चेत होते. रोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन सेनेची भूमिका स्पष्ट करत होते. 'सामना'च्या मथळ्यात रोज सकाळी काय असणार याकडेही अनेकांच्या नजरा लागलेल्या असायच्या. तसेच त्यांचे ट्विटर हॅण्डलही सारखे अपडेटेड असायचे. आजही त्यांनी 'how is josh?' जय मह्राराष्ट्र...असे ट्विट केले आहे.