मुंबई - घर भाड्याने देणे, दुरुस्ती किंवा विकण्यासाठी सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र ( No Objection Certificate ) बंधनकारक होते. त्यामुळे मालक आणि सोसायटीसोबत वाद निर्माण होत होते. गृहनिर्माण विभागाने ( Department of Housing ) ही अट वगळून घर मालकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट मुंबईसह राज्यातील घर मालकांना घर विकताना किंवा भाड्याने देताना, दुरुस्ती करण्यासाठी सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. प्रमाणपत्रमध्ये विशेष बाबींबाबत सोसायट्यांकडून हट्टाहास धरला जाय असे. त्यातून वादाला तोंड फुटत होते. हे वाद उपनिबंधकाकडे तसेच न्यायालायच्या दरबारात पोहोचत आहेत. सोसायट्याचे हित यातून साध्य होत नाही. गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी हे वाद मिटवून त्यावर तोडगा काढण्यासाठी सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री आव्हाड यांनी याबाबत ट्विट केले आहे. घर मालकाला विकायचा किंवा भाड्याने द्यायचा असेल, तर आता सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्रची आवश्यकता नाही. या अटीमुळे वाद होत आहेत, असल्याची बाब त्यांनी ट्विटच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली आहे.
हेही वाचा - Raj Thackeray In Thane :आज ठाण्यात 'राज'यांची तोफ कडाडणार! मनसे'कडून सभेची जोरदार तयारी