ETV Bharat / city

Jitendra Awhad On Demonetization : नोटबंदीमुळे एसआरएचे ५२३ प्रकल्प रखडले : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड - मुंबई हिवाळी अधिवेश २०२१

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी केलेल्या नोटबंदीचा फटका म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांना ( MHADA Housing Projects Affected Demonetization ) बसला आहे. नोटबंदीमुळे एसआरएचे ५२३ प्रकल्प रखडले ( SRA Projects Stalled Demonetization ) आहेत. पुनर्विकास करण्यासाठी संस्था म्हाडाकडे आल्या तर निश्चितच वेळेत घरे मिळतील, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Dec 23, 2021, 8:29 PM IST

Updated : Dec 23, 2021, 10:50 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे एसआरचे ५२३ प्रकल्प रखडले ( SRA Projects Stalled Demonetization ) आहेत. नोटबंदी झाल्याचा फटका म्हाडाच्या गृहनिर्माणाला बसला ( MHADA Housing Projects Affected Demonetization ) आहे. म्हाडा सक्षम प्राधिकरण असून, पुनर्विकासासाठी संस्था म्हाडाकडे आल्या तर त्यांना निश्चितच वेळेत घरे मिळू शकतील, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी विधान परिषदेत ( Maharashtra Council Winter Session 2021 )व्यक्त केला.

अनेक इमारती मोडकळीस

काँग्रेसचे भाई जगताप ( MLC Bhai Jagtap ) यांनी वाढीव चटई क्षेत्र न मिळाल्याने गृहनिर्माण संस्थांचा रखडलेला विकास याबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न मांडला होता. मुंबई आणि उपनगरात सुमारे 50 हजार गृहनिर्माण संस्था असून, महाराष्ट्रात 1 लाख गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी अऩेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यांच्याकडे असलेला एफएसआय वापरलेला नसतानाही सभासदांकडे पैसा नाही. त्यामुळे अनेक इमारती दुरुस्तीपलिकडच्या आहेत, असे अनेक मुद्दे भाई जगताप यांनी उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.

523 योजना रखडल्या

आर्थिक क्षमता नसलेले लोक गृहनिर्माण क्षेत्रात शिरल्याने अऩेक योजना रखडल्या आहेत. तसेच नोटबंदीचा फटकाही त्यांना बसला आहे. नोटबंदीमुळे एसआरच्या 523 योजना रखडल्या आहेत. 1 जानेवारीपासून 2022 पासून या रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचे काम गृहनिर्माण विभागामार्फत करण्यात येणार आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच ज्यांच्या योजना रखडलेल्या आहेत. ते म्हाडाकडे आल्यास त्या पूर्ण करण्यास म्हाडा सक्षम आहे. म्हाडा आज विश्वासू गृहनिर्माण संस्था असून, एका घरासाठी सुमारे 217 अर्ज असे प्रमाण आहे.

वन जमिनींवर घरांचा पुनर्विकास

उपनगरात महसूल विभागाची जमिनींवर घरे बांधलेली आहेत. त्यांचे कन्व्हेअन्स झालेले नसल्याने पुनर्विकासात अडचण येत आहे. अशा जमिनींवरील घरांच्या पुनर्विकासासाठी खासगी बिल्डर्स पुढे येतात. परंतु ते प्रकल्प रखडवून ठेवतात. अशा बिल्डर्सवर कारवाई करणार असल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगितले. प्रवीण दरेकर ( Opposition Leader Pravin Darekar ) यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. रखडलेल्या प्रकल्पांबाबत बिल्डर, सोसायटी यांनी म्हाडाबरोबर करार केल्यास हे प्रकल्प पूर्ण होऊ शकतात, अशी ग्वाही आव्हाड यांनी दिली. वन जमिनींवरील घरांच्या पुनर्विकासास मात्र म्हाडा असमर्थ आहे, असेही आव्हाड म्हणाले. तसेच वन जमिनीवरील घरांच्या पुनर्विकासासाठी केंद्राची मान्यता लागेल. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

एसटीच्या जमिनींचाही विकास शक्य

एसटीच्या जमिनी म्हाडा घेणार का, असा प्रश्न प्रसाद लाड ( MLC Prasad Lad ) यांनी उपस्थित केला असता आव्हाड यांनी सांगितले की, म्हाडा प्रत्यक्ष त्या जमिनी घेणार नाही. मात्र परिवहन मंत्र्यांच्यामार्फत तसा प्रस्ताव आल्यास त्याबाबत विचार करण्यात येईल. अनेक जिल्ह्यातील एसटी स्थानके शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्यांचा विकास केल्यास महसूलही चांगला मिळू शकेल. मात्र त्यासाठी गृहनिर्माण, परिवहन हे विभाग एकत्र बसून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे आव्हाड म्हणाले.

Last Updated : Dec 23, 2021, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.