ETV Bharat / city

Bombay High Court घर मालक आपली जबाबदारी नाकारु शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय - Decision of Bombay High Court

भाड्याने दिलेल्या घरांमध्ये अनधिकृत होणाऱ्या कामाला, घरमालक 'घर मालकाची जबाबदारी' या नात्याने नाकारु (Home owner cannot deny his responsibility) शकणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील एका घरमालकाच्या याचिकेवर (Decision of Bombay High Court) नोंदवले आहे. तसेच घरमालकाला कुठलाही दिलासा देण्यास, मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
author img

By

Published : Sep 11, 2022, 3:56 PM IST

मुंबई - पुणे येथील वाकड परिसरातील एका घरामध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी घरमालका विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने, या विरोधात घरमालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने घर मालकाला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे. भाडेकरूला घर भाड्याने दिले असले तरी, घरामध्ये होत असलेल्या अनिश्चित आणि अनधिकृत बेकायदेशीर प्रकाराची घरमालक या नात्याने जबाबदारी नाकारता (Home owner cannot deny his responsibility) येणार नाही, असे मत न्यायालयाने याचिकेवर सुनवणी दरम्यान नोंदवले (Decision of Bombay High Court) आहे.

पुणे पोलिसांनी कारवाई : पुणे येथील वाकड परिसरातील एका घरात स्पा चालविण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती, पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या घरावर डिसेंबर 2021 मध्ये छापा टाकला. या धाडीत सापडलेल्यांना अटक करण्यात आली. या घरातून काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली. याप्रकरणी मूळ घरमालकाविरोधातही पोलिसांनी कारवाई केली होती.

घरमालकाने केली याचिका दाखल : या कारवाई विरोधात घरमालकाने मुंबई उच्च् न्यायालयात याचिका दाखल करून, ही कारवाई चुकीची आणि अयोग्य असून कारवाई रोखा अशी विनंती केली होती. या याचिकेवर न्यायामूर्ती नितीन जामदार आणि न्यायामूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी घरमालकाच्या वतीने आपण आपले घर भाड्याने दिले होते. त्या घरात सुरू असलेल्या गैरकृत्यांबाबत कोणतीही गोष्ट अपणास माहिती नव्हती. तसेच या कारवाई नंतर त्यांच्याशी लिव्ह अँड लायसन्स करार रद्द करून, आम्ही त्या जागेचा ताबा घेतला आहे होता. घरमालक म्हणून कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात आपला सहभाग नव्हता. आपण निर्दोष असून आपल्या विरोधातील कारवाई रोखावी, अशी विनंती याचिका या घरमालकाने दाखल केली होती.

या याचिकेची गंभीर दखल घेत खंडपीठा म्हटले की, याचिकाकर्ती व्यक्ती ही त्या घराची मूळ मालक आहे. त्या घरात वेश्याव्यवसाय सारखी बेकायदेशीर कृत्य सुरू होती. कोणालाही लिव्ह अँड लायन्सस करारावर घर भाड्याने देण्याचा अर्थ त्या जागेचा संपूर्ण ताबा देणे असा नसतो. आपल्या घरात हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची जराही कल्पना घरमालकाला नव्हती; यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. केवळ त्या जागेचा थेट ताबा तेव्हा मालकाकडे नव्हता; म्हणून तो निर्दोष आहे असे म्हणता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने घरमालकाचा युक्तिवाद अमान्य केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.