मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांना आत्मघाती स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारावर चालत असल्याने अशा प्रकारच्या धमक्या त्यांना येत असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले असून अशा धमक्या देणाऱ्यांना मुळासकट ठेचण्याचे काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis करतील, असे यावेळी ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले प्रवीण दरेकर ? महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावर बोलताना प्रवीण दरेकर होणारे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची हिंदुत्ववादी विचारधारा हाती घेतल्यानंतर हिंदू विरोधी ज्या आतंकवादी प्रवृत्ती आहेत. त्या डोक वर काढत आहेत की काय ? अशी शंका आहे.
अतिशय दांडगा अनुभव या राज्यामध्ये एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अनेक आतंकवादी देश प्रवृत्ती संघटना आहेत. त्यांना ठेचून काढण्याचं काम सुरू आहे. त्यामुळेच भयभीत होऊन अशा पद्धतीचे काही कट होत आहेत का ? ते बघावे लागेल. परंतु या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांना या सर्व बाबींचा अतिशय दांडगा अनुभव आहे, व ते नीट अभ्यास करून या सर्व गोष्टींचा अभ्यास करतील. याच्या मुळाशी जाऊन यांना मुळासकट ठेचून काढल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे.