मुंबई - मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी पोलिसांना दर महिन्याला 100 केटी वसुलीचे टारगेट दिले आहे, असे परबीर सिंग यांनी म्हटले होते. दरम्यान यावरून आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसले, आणि आज अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.
जयश्री पाटील यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नैतीकदृष्ट्या आपल्याला या पदावर राहणे योग्य वाटत नसल्याने, आपण राजीनामा देत आहोत, असे अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे.