ETV Bharat / city

'पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही' - coronil medicine news

ट्विट करत त्यांनी या औषधाच्या विक्रीवर सध्या परवानगी देता येणार नसल्याचे म्हटले आहे.

home-minister-anil-deshmukh
home-minister-anil-deshmukh
author img

By

Published : Feb 23, 2021, 5:38 PM IST

Updated : Feb 23, 2021, 9:20 PM IST

मुंबई - पतंजली आयुर्वेदद्वारा निर्मित कोरोनील औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ट्विट करत त्यांनी या औषधाच्या विक्रीवर सध्या परवानगी देता येणार नसल्याचे म्हटले आहे.

'योग्य प्रमाणपत्र आल्याशिवाय परवानगी नाही'

कोरोनील औषधाचे परीक्षण अद्याप योग्यरित्या झालेले नाही. या औषधावर आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन)ने प्रश्न उपस्थित केला आहे. डब्लूएचओनेदेखील यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत हे औषध उपलब्ध करून देणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. म्हणजेच डब्लूएचओ, आयएमए यांसह अन्य संस्थांद्वारे योग्य प्रमाणपत्र आल्याशिवाय कोरोनीलला परवानगी देणार नाही, असे देशमुख म्हणाले.

रामदेव बाबांचा दावा

कोरोना विषाणू संसर्गावर पंतजली गुणकारी असून जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. देशातील आयएमए या आरोग्य संघटनेने यावर आक्षेप घेतल्यानंतर पंतजलीने जागतिक आरोग्य संघटनेने नव्हे तर भारत सरकारने औषधाचे प्रमाणपत्र दिल्याची कबुली दिली. त्यामुळे औषधांचे प्रमाणिकरण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोरोनील औषधाला बंदी घातल्याची माहिती, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

'योग्य प्रमाणिकरण झाल्याशिवाय विक्रीस परवानगी नाही'

पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा चुकीचा ठरवला. कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढतो आहे. देशातून कोरोना अद्याप गेलेला नाही. देशातील आरोग्य यंत्रणांना कोरोनावर रामबाण उपाय शोधण्यास अद्याप यश आलेले नाही. असे असताना इतक्या घाईने कोरोनील हे औषध बाजारात आणणे, केंद्रातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याला पाठिंबा देणे, हे अयोग्य असल्याचे मत, जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून मांडण्यात आले होते. त्यामुळे योग्य प्रमाणिकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटरद्वारे केली आहे. महाराष्ट्रात हा रामदेव बाबाला झटका असल्याचे बोलले जात आहे.

गडकरींच्या उपस्थितीत लॉन्चिंग

रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनील या औषधाचे लाँचिंग केले. “गर्वाचा क्षण… पतंजलीद्वारे कोव्हिड 19च्या करिता पहिले प्रमाणित औषध सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे”, असे पतंजली आयुर्वेदने ट्विट करून म्हटले. आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनील कोट्यवधी लोकांना जीवन देत आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे लोकांना ज्या शंका होत्या त्याही दूर केल्याचे पतंजलीने म्हटले आहे.

डब्ल्यूएचओ आणि आयएमएचा आक्षेप

पतंजलीने कोरोनील औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला होता. जागतिक आरोग्य विभागाने हा दावा खोडून काढत, आम्ही अशा कोणत्याही पारंपरिक/आयुर्वेदिक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिले नसल्याचे म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. पतंजलीचे औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

भारत सरकारचे प्रमाणपत्र

कोरोनील वादात सापडल्यानंतर पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी यावर खुलासा केला. आमच्या औषधाला मिळालेले प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले नसून भारत सरकारच्या विभागाने दिलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरीही दिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 23, 2021, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.