ETV Bharat / city

'वसतिगृहात महिलेला विवस्त्र करून नृत्य करायला लावल्याचे वृत्त खोटे' - ajit pawar latest news

पोलिसांनी या महिलेबरोबर कोणताही अनुचित प्रकार केला नाही. ह्या वसतिगृहात पोलीस गेले नाहीत. पोलीस वसतिगृहात गेल्याची कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.

home minister anil deshmukh
home minister anil deshmukh
author img

By

Published : Mar 4, 2021, 3:20 PM IST

जळगाव - 20 फेब्रुवारीला एका वसतीगृहातील मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या कपड्यांचा त्रास झाल्याने ते कपडे काढून ठेवले. पोलिसांनी या महिलेबरोबर कोणताही अनुचित प्रकार केला नाही. ह्या वसतिगृहात पोलीस गेले नाहीत. पोलीस वसतिगृहात गेल्याची कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.

चार वरिष्ठ अधिकारी महिलांच्या समितीने केली चौकशी

या प्रकरणात चार महिला अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही, असा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. सदर महिलेच्या नवऱ्याने अनेकदा आपली पत्नी वेडसर असल्याचे सांगितले आहे. तिला मनोरुग्णालयात पाठवण्यात यावे, असेही त्याने म्हटले होते. या वसतीगृहात कोणताही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. किंबहुना पोलिसांना या वसतीगृहात जाण्याची परवानगी नाही. 20 फेब्रुवारीला या वसतीगृहात मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या कपड्यांचा त्रास व्हायला लागल्यामुळे ते काढून ठेवले.

'अशा खोट्या बातम्यांनी वसतिगृहांची बदनामी'

हे वसतिगृह अगदी चांगल्या सोसायटीत असून सदर महिला ही आम्हाला मानसिक त्रास आहे. त्यावेळी तक्रारही त्या महिलेच्या नातेवाईकांनी केली होती. या सोबतच वसतिगृहात वेळोवेळी या महिलेकडून आरडाओरड केला जात होता. पोलीस आलेल्या घटनेत कोणतेही तथ्य नाही, अशा बातम्यांमुळे वसतिगृहांची बदनामी होते, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

'महिलांच्या मुद्द्यावर विरोधकांनी संयम राखावा'

अजित पवार जळगाव वसतिगृहामध्ये कोणता प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून देण्यात आल्यानंतर असा एखादा मुद्दा समोर आला, तर त्याची शहानिशा विरोधकांनीदेखील केली पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.