ETV Bharat / city

'गँगस्टर एजाज युसुफ लकडावालाला अटक' - DIG Nishikant More Case

काही दिवसांपूर्वी लकडावालाची मुलगी शिफा शेख हिला अटक करण्यात आली होती. तेथूनच पोलिसांना लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि त्याला अटक करण्यात यश आले, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 9, 2020, 7:48 PM IST

मुंबई - गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला काल बुधवारी रात्री पटना शहरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीचे त्यांनी अभिनंदन केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, संतोष रस्तोगी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद...

हेही वाचा... निर्भया प्रकरण: दोषी विनय कुमारने दाखल केली 'क्युरेटीव्ह पिटीशन'

गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत. त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोक्काचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा कुख्यात गुंड दाऊदबरोबर काम करत असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे काम करु लागला. त्याच्यावर खंडणी, मोक्कासारखे विविध खटले दाखल आहेत. पोलिसांना काल पटना येथून त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा...आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते, 'सामना'तून भाजपला टोला

काही दिवसांपूर्वी लकडावालाची मुलगी शिफा शेख हिला अटक करण्यात आली होती. तिने वडिलांचे नाव मनिष अडवाणी असे दाखवून बनावट पासपोर्ट बनवला होता. तिला पासपोर्ट अ‌ॅक्टनुसार अटक करण्यात आली. तेथूनच पोलिसांना लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात यश आले, असे देशमुख यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'सीएएवरून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करा' म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयानं दिलं 'हे' उत्तर

कोरेगाव भीमा प्रकरणावर केले भाष्य...

कोरेगाव - भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच आपण याप्रकरणी भूमिका मांडू, असे मंत्री देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कोरेगाव- भीमा संदर्भात काही माध्यमांनी माझ्या नावे चुकीची माहिती प्रसारित केली. कोरेगाव-भीमा संदर्भात सर्व अभ्यास करुन आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर बोलेन, असे ते यावेळी म्हणाले.

फ्री काश्मीर फलक प्रकरणाची चौकशी होईल...

जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा फलक होता. यामागे तिचा उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही. नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा, या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीर’चा फलक लावल्याचे तरुणीने सांगितले होते. याबाबत पोलीस चौकशी करीत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असेही देशमुख यांनी सांगितले.

डीआयजी मोरे प्रकरणाची चौकशी सुरू आहे....

डीआयजी निशिकांत मोरे प्रकरणामध्ये मोटार ट्रान्सपोर्टचा वाहन चालक असलेला दिनकर साळवे हा पिडीत मुलीच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्याची संपूर्ण चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

हेही वाचा... डीआयजी मोरे प्रकरणाला नवे वळण; पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर सांगून धमक्या

Intro:Body:mh_mum_anil_deshmukh_ministers_mumbai_7204684
Live 3G anil nirmal
गँगस्टर एजाज युसुफ लकडावालाला अटक

-गृह मंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याला काल रात्री पाटणा शहरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एका मोठ्या गँगस्टरला पकडण्यासाठी मुंबई पोलीस दलाने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी पोलीसांचे अभिनंदन केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, संतोष रस्तोगी उपस्थित होते.

मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, गँगस्टर एजाज युसुफ लकडावाला याच्यावर खंडणीचे सुमारे २५ एफआयआर दाखल आहेत. त्याचबरोबर इतर ८० केसेस दाखल असून मोकाचे ४ खटले दाखल आहेत. छोटा राजन हा दाऊद इब्राहीमबरोबर काम करत असताना लकडावाला त्याच्यासोबत होता. छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाल्यानंतर लकडावाला हा छोटा राजनसमवेत काम करु लागला. २००८ मध्ये छोटा राजनपासून विभक्त होऊन तो स्वतंत्रपणे ऑपरेट करु लागला. त्याच्यावर खंडणी, मोकासारखे विविध खटले दाखल आहेत. पोलीसांच्या प्रयत्नातून काल पाटणा येथून त्याला अटक करण्यात यश आले, अशी माहिती त्यांनी दिली.

शिफा शेख ही लकडावालाची मुलगी आहे. तिने वडिलांचे नाव मनिष अडवाणी असे दाखवून बनावट पासपोर्ट बनवला होता. तिला पासपोर्ट ॲक्टनुसार अटक करण्यात आली. तेथून लकडावालाच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि पोलीसांच्या प्रयत्नातून लकडावालाला काल रात्री अटक करण्यात यश आले, अशी माहिती मंत्री श्री. देशमुख यांनी दिली.

कोरेगाव - भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. अधिकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतरच मी याप्रकरणी भूमिका मांडेन, असे मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले की, कोरेगाव- भीमा संदर्भात काही माध्यमांनी माझ्या नावे चुकीची माहिती प्रसारीत केली. कोरेगाव- भीमा संदर्भात सर्व अभ्यास करुन आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर बोलेन, असे ते म्हणाले.

जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करताना गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी महेक मिर्झा प्रभू या तरुणीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा फलक होता. यामागे तिचा उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही, नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे, या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीर’चा फलक लावला, असे त्या तरुणीचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करीत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर गुन्ह्याबाबत निर्णय घेऊ, असे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

डिआयजी निशिकांत मोरे प्रकरणामध्ये मोटार ट्रान्सपोर्टचा वाहन चालक असलेला दिनकर साळवे हा पिडीत मुलीच्या घरी गेला होता, अशी माहिती आहे. त्याची संपूर्ण चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.