ETV Bharat / city

Home brewery closed : घरपोच मद्यविक्री बंद, राष्ट्रवादी शिवसेनेलाच मते देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार - undefined

उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत घेतली. त्यांनी परिषदेत त्यांनी सांगितले की, कोरोना कालावधीमध्ये घरपोच मद्यविक्रीचा निर्णय आम्ही रद्द (Home brewery closed) करीत आहोत, तसेच पेट्रोल-डिझेलवरील कर आणखी कमी होणार नाहीत. (Tax On Petrol-Diesel is No Less) तसेच, आमची मते ही शब्द दिल्याप्रमाणे शिवसेनेलाच असतील. त्याचबरोबर बुलेट ट्रेन प्रकल्पदेखील लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Jun 2, 2022, 4:07 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ( Deputy Chief Minister) त्यात त्यांनी सांगितले की, कोरोना कालावधीमध्ये सुरू केलेला घरपोच मद्यविक्रीचा निर्णय आम्ही रद्द करीत आहोत. त्यामुळे घरपोच मद्यविक्री बंद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादीची मते शिवसेनेलाच : राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेलाच मते देणार असून, राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस अधिकची मते देणार असल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली. राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व पक्षांचे उमेदवार योग्य मतांनी निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेसाठी असलेली चुरस महत्त्वाची आहे. पक्षीय उमेदवारांना मत द्यावे लागणार असल्याने त्यामध्ये घोडाबाजार होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अपक्षांनी मत दाखवून दिले, तर ते मत बाद होते. त्यामुळे अपक्षांच्या मतावरच सर्व मदार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शब्द दिल्याप्रमाणे शिवसेनेचा दुसरा उमेदवार आला. आम्ही आमची अधिकची मते देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेलवरील दर कमी केला : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत विरोधक ओरडत असले, तरी आधी केंद्राने दर कमी करावेत, असे सांगतानाच जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने दिला आहे. मात्र, तो जुना परतावा आहे. अजूनही केंद्राकडे पंधरा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच राज्य सरकारने घरगुती गॅस आणि पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केल्याने साडेतीन हजार कोटी रुपये भार सोसावा लागला आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक दर कपात होणार नाही, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बुलेट ट्रेनसाठी सकारात्मक विचार व्हावा : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी शंभर हेक्टर जमीन महाराष्ट्रातील आहे. यापैकी चार एकर जमीन शासकीय, तर उर्वरित जमीन वनविभागाच्या अखत्यारीतील आहे. मात्र, असे असताना हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. तो पूर्ण व्हावा अन्यथा असा प्रकल्प रखडल्यास खूप मोठे नुकसान होते, असे आपले वैयक्तिक मत आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार आणि मुख्यमंत्री घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : केंद्रासह राज्याच्या कृषी विभागाच्या योजना 100 टक्के राबविणार - अजित पवार

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.