मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईला मायानगरीही म्हटले जाते. त्यामुळे मुंबईमध्ये अनेक देशांत अनेक राज्यातून लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. मुंबईची लोकसंख्या दोन कोटीच्या जवळपास आहे. मुंबईमध्ये न्याय देण्याचे काम करणारे न्यायालयची संख्या मुंबई उच्च न्यायालयासह आठ न्यायालय मुंबईमध्ये आहेत. हे न्यायालय कुठे आहे काय आहे कामाचे स्वरूप याचा थोडक्यात आढावा...
मुंबई उच्च न्यायालय - चर्चगेट येथील ओव्हल मैदानासमोर मुंबई उच्च न्यायालयाची भव्य आणि देखणी इमारत आहे. 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची 1861 च्या उच्च न्यायालय अधिनियमांतर्गत स्थापना करण्यात आली. इंग्लंडच्या राणीने ज्या तीन न्यायालयांच्या बांधकामास परवानगी दिली. त्यापैकी एक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या जागी सर्वात प्रथम महापौर न्यायालय होते जे 1726 ते 1798 दरम्यान कार्यरत होते. त्यानंतर रेकॉर्डरचे न्यायालय 1824 पर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतर 1824 ते 1862 दरम्यान मुंबईचे सर्वोच्च न्यायालय होते. ज्याचे नंतर म्हणजेच 1962 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रूपांतर झाले. एका ब्रिटिश अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या इमारतीचे काम 1871 मध्ये सुरू होऊन 1878 साली पूर्ण झाले. सध्याच्या इमारतीत पहिले सत्र 1979 साली आयोजित करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र आता गोव्यापर्यंत पसरले आहे. त्याचसोबत दमन-दिव, दादरा व नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येतात.
मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय ( किल्ला कोर्ट ) - सीएसटी परिसरामध्ये असलेल्या मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने किल्ला कोर्ट म्हणूनही ओळखले जाते. याच न्यायालयाच्या खाली आजाद मैदान पोलीस ठाणेही आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय होण्यापूर्वी ब्रिटिश काळात याठिकाणी ब्रिटिशांकडून दारुगोळे, बंदुके याठिकाणी ठेवण्यात येत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने विविध कामांसाठी या इमारतीचा उपयोग करण्यात येत होता. महाराष्ट्राचे निर्मितीनंतर याठिकाणी आजाद मैदान पोलीस ठाणे त्यानंतर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे.
दिंडोशी सत्र न्यायालय - मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अंधेरी ते दहिसर या परिसरामधील होणारे गुन्हा गाराना शिक्षा देण्याचे काम दिंडोशी सत्र न्यायालयात केले जाते. दिंडोरी येथील सत्र न्यायालयामध्ये होतया दिंडोशी सत्र न्यायालयात एकूण 12 कोर्ट आहे. या न्यायालयामध्ये वाढत्या प्रकरणामुळे आणखी न्यायालय वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, अद्याप ती मंजूर झालेली नाही आहे.
मुंबई सत्र न्यायालय - मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजूला मुंबई सत्र न्यायालय आहे. या न्यायालयामध्ये एकूण 40 कोर्ट आहे हे न्यायालय खूप वर्षे जुने आहे. एकेकाळी अंडरवर्ल्डचे साम्राज्य असणाऱ्या मुंबईत सातत्याने रोज गॅंगवार पाहायला मिळत होता. या गॅंगवारमध्ये अनेक डॉनला पकडल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येत होते. त्यामुळे मुंबईतील अनेक गॅंगशी संबंधित असलेल्या आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा दिली आहे. याच न्यायालयामध्ये अभिनेता संजय दत्त यालाही शिक्षा सुनावली होती.
मुंबई शहरामध्ये न्यायदानाचे काम करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, दिंडोशी सत्र न्यायालय, मुंबई सत्र न्यायालय, मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात, शिवडी दंडाधिकारी न्यायालय, गिरगाव दंडाधिकारी न्यायालय, अंधेरी दंडाधिकारी न्यायालय, बांद्रा दंडाधिकारी न्यायालय, बोरवली महानगर दंडाधिकारी न्यायालय इतके न्यायालय मुंबईमध्ये आहे.
हेही वाचा - BMC RAT kiiling : मुंबई पालिकेने पाच वर्षांत मारले १६ लाख ४५ हजार उंदीर