मुंबई - घडाळ्याचा काट्यावर दररोज मुंबई धावते. आजपर्यंत अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, मात्र मुंबईची उपनगरीय लोकल सेवा कधीही ठप्प झालेली नव्हती. मात्र, कोरोनामुळे पहिल्यांदाच तब्बल 3 महिने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प होती. याकठीण परिस्थितीत मुंबईला वेळ दाखवणाऱ्या घड्याळाची टिकटिक सतत सुरू होती.
![historical tower clock](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-csmt-tower-watch-7209757_17032021193951_1703f_1615990191_524.jpg)
1888मध्ये बसविली घड्याळ
जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनसच्या इमारतीवरून ब्रिटिशांनी ऐतिहासिक टॉवर क्लॉक 1888 रोजी बसविण्यात आलेली होती. गेल्या 133 वर्षांपासून मुंबईकरांना वेळ दाखविण्यासाठी निरंतर ही घड्याळ सुरू आहे. कोरोनासारख्या संकटकाळातही संपूर्ण मुंबई ठप्प होती. मुंबईची जीवनवाहिनी स्तब्ध उभी होती. मात्र, मुंबईला या कठीण काळातसुद्धा वेळ दाखवणारे ऐतिहासिक टॉवर क्लॉक सुरू होती. यांची जबाबदारी मध्य रेल्वेतील कर्मचारी महेंद्र सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर होती.
170 किलोची हेरिटेज घड्याळ
सीएसटीच्या मुख्य इमारतीच्या टॉवरला ही घड्याळ 133 वर्षांपासून जुनी आहेत. या घड्याळीचे वजन 170 किलो असून ही घड्याळ चावीवर चालते. या टॉवर क्लॉकची उंची 10 फूट आहे, त्यातील मिनिटकाटा साडेतीन फूट तर तास काटा अडीच फुटाचा आहे. या घड्याळाला एकदा चावी दिली, की चार ते पाच दिवस सुरू राहते. त्यानंतर पुन्हा चावी दिली जाते. मोठ्या काळजीपूर्वक या टॉवर क्लॉकला चावी द्यावी लागते, अशी माहिती ईटीव्ही भारताला मध्य रेल्वेचे मास्टर कम्युनिकेशन मेकॅनिकल महेंद्र सिंग यांनी दिली.
आव्हानात्मक काळ
महेंद्र सिंग यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, की मध्य रेल्वेच्या सीएसएमटीतील सिग्नल आणि टेलिकॉम कार्यालयात मास्टर कम्युनिकेशन मेकॅनिकल या पदावर 2002पासून कार्यरत आहे. 'टॉवर क्लॉक' शिवाय रेल्वे स्थानकावरील सर्व इलेक्ट्रिक दुरुस्तीचे काम ते आणि त्यांचे सहायक धर्मेंद्र कुमार सिंग आणि अमोल सावंत करतो आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्यासुद्धा बंद होत्या. त्यामुळे या आव्हानात्मक काळात टॉवर क्लॉक आणि इतर घड्याळे सुरू ठेवणे कठीण होते. मात्र, मी आणि माझ्या सहकारी धर्मेन्द्र कुमार सिंग आणि अमोल सावंत यांच्या मदतीमुळे याकठीण काळातही सोमवार आणि शुक्रवारी घड्याळांना चावी देण्यासाठी येत होतो.
20 ठिकाणी ब्रिटिश टॉवर क्लॉक
सव्वाशे वर्षानंतरही मुंबईमध्ये ब्रिटिशकालीन अशा इमारती भक्कमपणे आज उभ्या आहेत. जगामध्ये मुंबईची महती अनेक कारणांसाठी आहेत. भारताची औद्योगिक राजधानी, हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर अशा नावावे ओळखली जाते. मुंबईतील सीएसएमटी हेरिटेज इमारतीवरील टॉवर क्लॉक अशा मुंबईत 20 ठिकाणी आहे. ज्यामध्ये थोडा बदल असून या सर्व घड्याळी ब्रिटिशकालीन आहे. या घड्याळ राजभाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, पोलीस मुख्यालय, एल्फिन्स्टन कॉलेज, ताज पॅलेस आणि टॉवर हॉटेलसारख्या ठिकाणी आहे.