मुंबई मुंबईमध्ये बेस्ट कंपनीतर्फे (Brihanmumbai Electricity Supply and Transport) नागरिकांना परिवहन आणि विद्युत सेवा दिली जाते. बेस्ट कंपनीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (AMRIT MAHOTSAV) साजरा केला जात आहे. यासाठी बेस्टकडून रवींद्रनाथ नाट्य मंदिर येथे बेस्टचा इतिहास (History of Best) या विषयवार ऐतिहासिक दिवे व रांगोळी प्रदर्शनीचे (Historical Lamps and Rangoli Exhibition) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जुन्या गॅसच्या दिव्यापासून आजच्या एलईडी दिव्यापार्यंतचा प्रवास नागरिकांना पाहता येणार आहे.
बेस्टचे दिव्यांचे आणि रांगोळी प्रदर्शन १८७३ मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनी लि. ची सुरुवात झाली. १८७४ मध्ये घोड्याने हाकणारी ट्राम सुरु झाली. १९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रॉमवेज कंपनी लिमिटेडची स्थापना झाली. (ब्रिटिश इलेक्ट्रिक कंट्रक्शन कंपनीकडून) ए पावर हाऊसमध्ये ११०० एचपी जनरेटर आणि १०७ ग्राहकांना सेवा देत, बेस्ट कंपणी सुरु करण्यात आली. बेस्टचे ७ ऑगस्ट १९४७ रोजी महापालिकाकरण झाले. बेस्टचे पालिकाकरण केल्यावर, रविवारी (७ ऑगस्ट) ७५ व्या वर्षात पदार्पण केले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बेस्टने ७५ व्या वर्षात केलेले पदार्पण, या पार्श्वभूमीवर बेस्टने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात जुन्या नव्या दिव्यांचे आणि रांगोळीचे प्रदर्शन आयोजित केले. ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनात १०० वर्षांतील गॅसचे दिवे ते एलईडी दिव्यांपर्यंतचा प्रवास नागरिकांना पाहता येणार आहे. बेस्टमध्ये काढलेल्या रांगोळींची प्रशंसा वेळोवेळी होते आहे.
दिव्यांचा इतिहास १८३३ मध्ये मुंबईत पहिल्यांदा गॅसचा दिवा लागला. पारशी व्यक्ती अर्देशीर कर्सेटजी यांना असे दिवे लावण्याचे श्रेय जाते. कोळशापासून गॅस बनवण्याचे यंत्र पाहण्यासाठी खुद्द गव्हर्नरही येथे पोहोचल्याचा इतिहास आहे. रस्त्यांवर दिवा लावण्याची कल्पना पहिल्यांदा १८४३ मध्ये केरोसिनच्या दिव्याच्या निमित्ताने अमलात आली. भेंडीबाजार, एस्प्लनेड रोड, चर्चगेट स्ट्रीट आदी ठिकाणी असे केरोसिनचे दिवे लागले. ‘बॉम्बे गॅस कंपनी लिमिटेड’ची स्थापना १८६२ मध्ये झाली. मुंबईत गॅसपुरवठ्याचे काम कंपनीने १९५० पर्यंत केले. त्यानंतरच्या काळात पथदिव्यांमध्ये विजेच्या स्रोतावर आधारित सोडियम दिव्यांपासून मेटल हलाईड, एचपीएसव्ही आणि मर्क्युरी व्हेपर लॅम्प, फ्लडलाईट्स, क्लस्टर एलईडी, सीओबी एलईडी फ्लड लॅटर्न दिवे लागले. यामध्ये जुन्या गॅसच्या दिव्यापासून आजच्या एलईडी दिव्यापार्यांतचा प्रवास नागरिकांना पाहता येणार आहे.
हेही वाचा : Har Ghar Tiranga १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाचे नियम आहेत वेगळे