मुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विरोधक या अधिवेशनात सरकारवर विविध मुद्द्यांवर आक्रमक होत आहेत. (Jayant Patil criticizes BJP) परंतु, विरोधकांचा हा नित्यनेम (Chief Minister Absent From The Winter Session) असून सरकार त्यांचे काम व्यवस्थित करत आहे. मुख्यमंत्री यांनी त्यांचा पदभार कोणाकडे द्यावा हा त्यांचा विषय आहे असे मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत.
सरकार गंभीर नाही विरोधकांचा आरोप
या प्रकरणी सरकार पूर्णतः गंभीर आहे. विरोधक नेहमी या पद्धतीचा आरोप करतात. परंतु, विरोधक यांनी त्यांचे काम सोडून इतर काम करण्यापेक्षा त्यांचं काम व्यवस्थित करावे अस पाटील म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री अनुपस्थित आहेत, विरोधकांची दिशाभूल केली
मुख्यमंत्र्याची तब्येत बरी नसल्याने हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे अशी विनंती सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाला केली होती. विरोधकांनी ती मान्य ही केली होती. (Chief Minister Uddhav Thackeray) मात्र, मुख्यमंत्री अनुपस्थित आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाची दिशाभूल केली जात आहे असा विरोधकांचा आरोप आहे. मुख्यमंत्री तब्येत बरी नसल्याने अनुपस्थित आहेत. विरोधक चुकीचा अर्थ काढत आहेत. अस पाटील म्हणाले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एका दिवसात महाराष्ट्र विकेल
मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने त्यांनी त्यांचा पदभार इतर कोणाकडे सोपवावा, परंतु तो कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातात देऊ नये अन्यथा ते एका दिवसात महाराष्ट्र विकून टाकतील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी त्यांना काही बोलायचे तो त्यांचा अधिकार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी तो पदभार कोणाकडेच सोपवावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असेही सांगितले आहे.
हेही वाचा - Police Notice to Nitesh Rane : नितेश राणेंना चौकशीसाठी पोलिसांची नोटीस, संतोष परब हल्ला प्रकरण