ETV Bharat / city

Hijab Controversy In Maharashtra : हिजाब समर्थनार्थ महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात झाले आंदोलन, वाचा सविस्तर...

कर्नाटकमध्ये हिंसक आंदोलने ( Violent Agitations in Karnataka ) झाली. तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या वादाचे आता महाराष्ट्रातही पडसाद उमटताना ( Repercussions In Maharashtra ) पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हिजाब समर्थनार्थ आंदोलने, ( Agitations For Hijab support ) निदर्शने केली जात आहे.

हिजाब वाद
हिजाब वाद
author img

By

Published : Feb 11, 2022, 5:47 PM IST

Updated : Feb 11, 2022, 6:29 PM IST

मुंबई - कर्नाटकमध्ये हिजाब परिधान ( Hijab Controversy ) करण्यावरून वाद सुरू झाला. मुस्लिम विद्यार्थिंनींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्याला विरोध केला जात आहे. मंगळवारी कर्नाटकमध्ये हिंसक आंदोलने ( Violent Agitations in Karnataka ) झाली. तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या वादाचे आता महाराष्ट्रातही पडसाद उमटताना ( Repercussions In Maharashtra ) पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये हिजाब समर्थनार्थ आंदोलने, ( Agitations For Hijab support ) निदर्शने केली जात आहे. हिजाब समर्थनार्थ आज (शुक्रवारी) मालेगावमध्ये 'हिजाब डे' पाळण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी त्याला विरोध केला आणि शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन, निदर्शने झाली, वाचा या विशेष रिपोर्टमधून....

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात हिजाब समर्थनार्थ झाले आंदोलन

  • बीड - कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाबच्या वादाने ( Hijab controversy in Karnataka ) आता राजकीय रंग घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या समर्थनाचे बोर्ड सध्या बीड शहरात लावण्यात ( Hijab controversy support boner in beed ) आले आहे. याच्या समर्थनाचे पोस्टर हे बशीर गंज चौकामध्ये लावण्यात आले. पहिले हिजाब फिर किताब अशा आशयाचे हे पोस्टर लावण्यात आले. पोस्टर लावल्यानंतर त्यांची चर्चा शहरांमध्ये जोरदार पद्धतीने सुरू होती.
  • मुंबई - मुंबईतील नागपाडा येथे स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले. प्रत्येक धर्मातील व्यक्तीला त्या त्या धर्मातील आचरण याप्रमाणे वागण्याची मुभा आणि स्वातंत्र्य संविधानाने प्रदान केले आहे. मुस्लिम महिलांचा हा संविधानिक अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे यावेळी आमदार रईस शेख यांनी म्हटले.
  • सोलापूर- 'एक नारी सबपर भारी'च्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम महिलांनी मोर्चा ( Women morcha in Solapur for Hijab ) काढला. एमआयएम पक्षाच्यावतीने सोलापुरात महिलांनी मोठा मोर्चा ( AMIM morcha to support Hijab ) काढण्यात आला. कर्नाटक सरकारचा निषेध करत महिलांनी शाळा, महाविद्यालय असू दे किंवा बाजारपेठ असू दे, बुरखा आणि हिजाब घालणारच अशी कडवट प्रतिक्रिया देत कर्नाटक सरकारचा निषेध केला.
  • औरंगाबाद - हिजाब प्रकरणाचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ( Vanchit Yuva Aghadi Agitation ) हिजाबच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा आंदोलक महिलांनी ( Women agitation to support Hijab ) दिला.
  • पुणे - पुण्यात राष्ट्रवादी काँगेसने ( protest against Hinab controversy in pune ) महात्मा फुले वाड्यात जोरदार आंदोलन केले. आम्हाला काय घालायचं किंवा आम्ही काय खायचं हे कोणी ठरवू शकत नाही. भाजपा सरकार मनमानी करत असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यानी केला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत मुस्लिम महिला देखील सहभागी झाल्या होत्या.
  • जालना - जालन्यात गुरुवारी (दि. 10 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिजाब समर्थक मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन कर्नाटकात झालेल्या हिजाब वादाचा निषेध केला. घटनेने सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र दिले आहे, त्यानुसारच आम्ही किंवा आमच्या मुली हिजाबचा वापर करतात, अशी प्रतिक्रिया आंदोलक महिलांकडून देण्यात आली. यावेळी 'पहले हिजाब, फिर किताब' यासह कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाही यावेळी उपस्थित महिलांकडून देण्यात आल्या.
  • अमरावती - अमरावतीत ( hijab controversy in amravati ) हिजाब परिधान करून अनेक युवती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. हिजाबचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या युवतींनी जिल्हाधिकारी पौनित कौर यांच्याकडे केली.

काय आहे हिजाब वाद ?

उडुपी आणि चिकमंगळुर शहरातील महाविद्यालयामध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली. 28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये घडली होती. त्यानंतर 5 शैक्षणिक संस्थानी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली. तर यावर कर्नाटक शिक्षण कायदाचा दाखला देत सरकारने म्हटले, की सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक आहे. कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार असल्याचे कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटले. यानंतर वाद चिघगळला उडुपीमधल्या खासगी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये घोषणाबाजी आणि वादावादी झाली. दोन गट एकमेकांसमोर आल्यानंतर संबंधित महाविद्यालय उच्च न्यायालयाचा याविषयीचा निकाल येईपर्यंत बंद करण्यात आले. शिवाय कर्नाटकच्या इतरही जिल्ह्यामध्ये यावरुन दगडफेकी सारख्या घडल्या आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार दोन शाळा आणि महाविद्यालय बंदच ठेवले.

हेही वाचा - Malegaon Hijab Day : मालेगावात 'हिजाब डे', पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Last Updated : Feb 11, 2022, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.