ETV Bharat / city

मुंबईत कोरोनामुळे 'या' विभागात सर्वाधिक मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या

दीड वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यू हे अंधेरी पूर्व येथील के ईस्ट तसेच भांडुप येथील एस विभागात झाले आहेत. तर सर्वात कमी मृत्यू हे फोर्ट कुलाबा येथील एल आणि सँडहर्स्ट रोड येथील बी विभागात नोंद झाले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Aug 6, 2021, 7:17 PM IST

मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा आल्या आहेत. या दीड वर्षाच्या कालावधीत तब्ब्ल १५ हजार ९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यू हे अंधेरी पूर्व येथील के ईस्ट तसेच भांडुप येथील एस विभागात झाले आहेत. तर सर्वात कमी मृत्यू हे फोर्ट कुलाबा येथील एल आणि सँडहर्स्ट रोड येथील बी विभागात नोंद झाले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

१५ हजार ९२० रुग्णांचा मृत्यू-

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून ४ ऑगस्टपर्यंत गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूचे ७ लाख ३६ हजार २२ रुग्ण आढळून आले आहेत. ७ लाख १३ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत ४ हजार ५३० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५९१ दिवस इतका आहे. कोरोनामुळे १५ हजार ९२० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ५० वर्षांवरील १३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

'या' विभागात सर्वाधिक मृत्यू-

मुंबईमधील अंधेरी पूर्व येथील के ईस्ट विभागात सर्वाधिक म्हणजे १२३० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भांडुप एस विभागात १०२७, बोरिवली येथील आर सेंट्रल विभागात ९८५, मालाड येथील पी नॉर्थ विभागात ९६२, कांदिवली येथील आर साऊथ विभागात ९३३, अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट ८५२, घाटकोपर येथील एन विभागात ८१८ मृत्यूंची नोंद झाली आहे.

'या' विभागात सर्वात कमी मृत्यूंची नोंद-

मुंबईत सर्वात कमी मृत्यू हे फोर्ट कुलाबा येथील ए विभागात नोंदवले आहेत. ए विभागात १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सँडहर्स्ट रोड येथील बी विभागात १८३, एच वेस्ट विभागात ४६३, गोवंडी मानखुर्द येथील एम ईस्ट विभागात ४८२, आर नॉर्थ विभागात ५०७, मुलुंड येथील टी विभागात ५३६, पी साऊथ विभागात ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न-

रुग्णालयात रात्रीच्या वेळेस ऑक्सिजनवर असलेले रुग्ण प्रसाधनगृहामध्ये जात असल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. या रुग्णांना बेडवर शौचालयाचे पॉट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी ही रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी यांची असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णांची माहिती दिवसातून दोन वेळा घ्यावी, आदी उपाययोजना राबवल्या जात आहेत. यामुळे मुंबईमधील मृत्यूची संख्या कमी झाली असून सध्या दिवसाला ३ ते ९ मृत्यू होत आहेत. ही मृत्यूंची संख्या शून्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा -लवकरच अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक होणार - किरीट सोमैया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.