मुंबई- शिंदे फडणवीस सरकारविरोधात आक्षेपार्ह देखाव्या उभारल्याप्रकरणी ( Offensive Appearance Against Shinde Fadnavis govt Mumbai ) पोलिसांनी केलेल्या कारवाईला कल्याण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उच्च न्यायालयात आव्हान ( Tarun Vijay Ganeshotsav Mandal in High Court ) दिले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने शुक्रवारी गणेशोत्सव मंडळाला देखावा चलचित्र दाखविण्यास सशर्त परवानगी दिली ( conditional permission Tarun Vijay Ganesh Mandal ) . तसेच देखाव्यात आक्षेपार्ह शब्द आणि चित्र वगळण्याचेही निर्देश दिले. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईवर पोलिसांना देखील न्यायालयाने फटकारले ( Tarun Vijay Ganesh Mandal reprimanded by court ) आहे.
शिवसेनेतील बंडखोरीवर 50 खोके एकदम ओके - कल्याणमधील 59 वर्ष जुन्या विजय तरूण मंडळाने शिवसेनेतील बंडखोरीवर 50 खोके एकदम ओके या संकल्पनेवर आधारित शिंदे फडणवीस सरकारवर उपहासात्मक भाष्य करणारा देखावा साकारला आहे. त्यावर आक्षेप घेत पोलिसांनी पहाटे 3 च्या सुमारास पोलिसांच्या फौजफाट्यासह कारवाई केली आणि देखावा जप्त केला आणि मंडळाच्या विश्वस्तांविरोधात कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यावर आक्रमक पवित्रा घेत आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. घटनेने आम्हाला दिलेले अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्या याचिकेवर शुक्रवारी न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. माधव जामदार यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
खंडपीठाचे मंडळाला खडेबोल - सुनावणीदरम्यान खंडपीठाने पोलिसांची चागलींच कान उघडणी केली चलचित्रामध्ये फोटोंचा वापर केल्याने कोणता गुन्हा होतो? अशा शब्दात फोटोवर आक्षेप घेणाऱ्या पोलिसांना खंडपीठाने जाब विचाराला. तसेच गणपती देखावा हा समाजाला सामाजिक संदेश देण्याचे काम करतो कोणत्याही व्यक्तींचा अपमान करत नाही अशा शब्दात खंडपीठाने मंडळालाही खडेबोल सुनावले. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने विजय तरूण मंडळाला अटीशर्तींसह देखावा, चलचित्र दाखविण्यास परवानगी दिली. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो वापरण्यास परवानगी दिली. मात्र, देखाव्यातील काही आक्षेपार्ह शब्द, चित्र, फोटो आंबा सोबत असलेलं एका व्यक्तीचं अमित शहा यांच्यासारख्या दिसणारा देखाव्यात न लावण्याचे आदेशही खंडपीठाने मंडळाला दिले.
देखाव्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता - शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर शिवसेनेत सुरू झालेला संघर्ष अद्याप थांबलेला नाही. दरम्यान यावरच कल्याण पश्चिम इथं रामभाग विभागात विजय तरुण गणेशोत्सव मंडळात देखावा उभारण्यात आला होता. मात्र या देखाव्यामुळे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सांगत पोलिसांनी कारवाई केली. 31 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास देखाव्याचं साहित्य जप्त केलं. गणरायाच्या प्रतिष्ठापनेआधीच पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकरणात आव्हान देण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.