ETV Bharat / city

Heroin Seize At Mumbai Airport : मुंबई विमानतळावर दोन विदेशी महिलांकडून ३ किलो ९१० ग्रॅम हेरॉईन जप्त - मुंबई विमानतळावर हेरॉईन जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji International Airport) सीमाशुल्क विभागाने २ परदेशी महिला नागरिकांना अटक (Two Foreign Women Arrest) केली असून त्यांच्याकडून ३ किलो ९१० ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

Heroin Seize At Mumbai Airport
Heroin Seize At Mumbai Airport
author img

By

Published : Nov 24, 2021, 5:18 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji International Airport) सीमाशुल्क विभागाने २ परदेशी महिला नागरिकांना अटक (Two Foreign Women Arrest) केली असून त्यांच्याकडून ३ किलो ९१० ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २० कोटी असल्याची माहिती आहे. या दोन्ही महिलांवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी महिला युगांडाच्या -

सीमाशुल्क विभागाने विमानतळावर या महिलांकडून ड्रग्ज जप्त केले. आरोपी महिला युगांडाची नागरिक असून तिने हेरॉइनच्या ड्रग्जची खेप सुदानहून दुबई आणि दुबईला मुंबईत आणली होती. ४५ वर्षीय कायंगेरा फातुमा आणि २७ वर्षीय मानसिम्बे झायना अशी अटक केलेल्या दोन महिलांची नावे आहेत. दोघेही सोमवारी विमानतळावर पोहोचले. स्कॅनरने त्यांची बॅग तपासली असता त्यात संशयास्पद पावडर असल्याचे आढळून आले. त्यांनी पांढरी पावडर काढून तपासणी केली असता ती हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून ३ किलो ९१० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आज दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Sangli : तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करणारा विकृत पोलीस कर्मचारी निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.