मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट संपत नाही तीच तिसऱ्या लाटेची चाहूल ऐकू येऊ लागली आहे. तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे, की कोरोनाच्या तिसर्या लाटेचा परिणाम सर्वात जास्त तरुण आणि मुलांवर होईल. हे रोखण्यासाठी सरकार सर्व शक्य तयारी करीत आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था आणि प्रसिद्ध व्यक्तींनी देखील मदतीचे हात पुढे केले आहेत. धार्मिक सीरियल रामायणात शत्रुघ्नची भूमिका साकारणारे समीर राजदा यांनी ‘वी हेल्प’ या संस्थेत सामील झालेल्या युवकांच्या मागणीनुसार नोटबुकचे वितरण केले. गरीब आणि गरजू मुलांना याचे वितरण केले आहेत. समीर म्हणतो, 'रामायणातील माझ्या भूमिकेमुळे लोकांना आपण सेवेसाठी सदैव तयार असले पाहिजे अशी प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण येथील लोकांची सेवा करण्यास तयार आहे'.
गरजवंतांना मदत
संघटनेचे अध्यक्ष उदय कपाडिया म्हणतात, कोरोना साथीच्या आजारात मुलांना सर्वाधिक धोका असतो. याची दक्षता घेत हेल्प चॅरिटेबल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. जे विद्यार्थ्यी ऑनलाइन शिकू इच्छित आहे परंतु त्यांच्याकडे पुस्तक नाहीत. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन मागणीच्या आधारे त्यांना बाजारभावाच्या ५०% टक्क्यांपेक्षा कमी किंमतीत पुस्तके आणि इतर आवश्यक स्टेशनरी वस्तू देत आहोत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला पुस्तके आणि आवश्यक स्टेशनरी घेण्यासाठी दुकानात जावे लागणार नाही. येत्या काळात आम्ही ही सेवा विस्तारण्याचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले.