मुंबई - मुंबई वाहतूक पोलिसांकडून आज ( बुधवारी ) नवीन परिपत्रक काढत बाईकवर प्रवास करणाऱ्या रायडरसह मागे ( Helmet necessary to colleague with a rider traveling on a bike ) बसणाऱ्याला व्यक्तीला देखील हेल्मेट घालने सक्तीची असणार आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक ( Mumbai Traffic Police ) कारवाई करण्यात येणार असल्याचे आज काढण्यात ( Helmet Mandatory New Circular ) आलेल्या परिपत्रक म्हटले आहे. पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांसाठी चालकाचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे.
अशी झाली कारवाई : पंधरा दिवसांनी मुंबईकरांना हेल्मेट घालून घराबाहेर पडावे लागणार आहे. मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास 500 रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल. मुंबई वाहतूक पोलिसांनी 6 एप्रिलपासून सुरू झालेल्या हेल्मेटविना वाहन चालविण्याच्या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 2,446 लोकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला आहे. पोलिसांनी 1,947 दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचे महत्त्व सांगितले आहे. याशिवाय, वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यात चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध 2,000 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, तर 200 वाहनचालकांना अनावश्यक हॉर्न वाजवल्याबद्दल प्रत्येकी 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा - Lonavala Dead Body Found : लोणावळ्यातील जंगलात आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह; 400 फूट खोल दरीत पडून मृत्यू