नवी मुंबई - पनवेल शहरात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून नवी मुंबई आणि पनवेल शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.
मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नवी मुंबई आणि पनवेल शहरातील नागरिकांनी घरातच थांबने पसंत केले. शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील रस्त्यांसह सोसायट्यांमध्ये देखील पाणी साचले आहे. मागील 24 तासात नवी मुंबईत सरासरी 228.60 मीमी पावसाची नोंद झाली आहे. यात बेलापूरमध्ये 278 मीमी, नेरुळ मध्ये 288 मीमी, वाशीमध्ये 186 मीमी, कोपरखैरणेममध्ये 217 मीमी, ऐरोलीमध्ये 182 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - मुंबईत पावसाचा कहर; नायर रुग्णालयाच्या कोव्हिड विभागात शिरले पाणी; रुग्णांचे हाल
नवी मुंबई शहरात गेल्या दोन दिवसांत 578.42 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर मोरबे धरण परिसरात 92 मीमी पावसाची नोंद झाली असून तीन दिवसांत 553.80 मीमी पावसाची नोंद झाली आहे. यासह शहरातील 9 ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प