ETV Bharat / city

Maharashtra Rain: राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज

author img

By

Published : Sep 9, 2022, 6:01 PM IST

अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला असून येत्या काही दिवसांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ( Heavy Rain with lightning ) इशारा दिला आहे.

Maharashtra Rain
राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज

मुंबई - अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला असून येत्या काही दिवसांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ( Heavy Rain with lightning ) इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभाग ( Meteorological Department ) मुंबईच्या शास्त्रज्ञ डॉक्टर सुषमा नायर यांनी याबाबत माहिती दिली असून बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती असल्याचे डॉक्टर नायर यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पत्ता - कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण पट्ट्यातील काही भाग, गोव्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. IMD ने पुढील पाच दिवस मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाच दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा स्थितीत मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पुढील पाच दिवस मुसळधार - भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) प्रादेशिक कार्यालयाने मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी आणि नाशिकसाठी यलो अलर्ट जारी केला होता. पुढील ५ दिवसांत या भागात मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात रविवारपर्यंत पाऊस सुरूच राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.