ETV Bharat / city

कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार; पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी

rain
पाऊस अपडेट
author img

By

Published : Aug 6, 2020, 4:07 PM IST

Updated : Aug 6, 2020, 8:00 PM IST

17:40 August 06

कल्याणमधील काळू नदीवरील पूल पाण्याखाली; १२ गावांचा संपर्क तुटला

thane rain
कल्याणमधील काळू नदीवरील पूल पाण्याखाली

ठाणे - मंगळवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील भातसा, काळू व उल्हास या तिन्ही नद्यांना पूर आला आहे. पाऊस असाच संततधार कोसळत राहीला तर सायंकाळपर्यत काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे.  त्यामुळे या भागातील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. 

16:57 August 06

गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार

कोल्हापूर - गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  आज सकाळपासून किंचित ओसरला आहे. मात्र, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सद्या नदीची 43 फूट पाणी पातळी आहे. 

15:27 August 06

राज्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत येत्या 24 तासात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई - आजही पावसाची संततधार सुरू असल्याने पेडर रोडवरील हँगिग गार्डनजवळील भिंत खचली. याची पाहणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिका काम करते मग पाणी कसे भरते, पालिकेचे कामं कुठे अडत आहे हे पाहिले पाहिजे. महानगरपालिकेने 113 टक्के नाले सफाई केली की फक्त सफाई केली हे त्यांचं त्यांना ठाऊक आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.  

रत्नागिरी - सलग 3 दिवस जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर ओसरला.  

हिंगोली - जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असून, ढगाळ वातावरण आहे.

जळगाव - जिल्ह्यात बुधवारी यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. आज जिल्ह्यात कुठेही पाऊस नाही.

जालना - आज दिवसभरात जालन्यात पाऊस नसून, ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद - आज शहरात ढगाळ वातावरण आहे. तसेच ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यम पाऊस सुरू आहे.  

Last Updated : Aug 6, 2020, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.