मुंबई - भारतीय हवामान विभागाकडून ( IMD ) राज्यभरात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे ( Heavy rain alert in Maharashtra ). पुढचे चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला ( Heavy Rain In Next Four To Five Days ) आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ( Citizens urged to be alert ) हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत 5 दिवस यलो अलर्ट - शहराला 5 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने रात्री मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गुरूवारी मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस (Heavy rain in Mumbai ) कोसळला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले मात्र, हलक्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत २९ जूनपासून पावसाचा जोर वाढला आहे. २ जुलैपर्यंत पाऊस सतत पडत होता. रविवारी पावसाने विश्रांती घेतली. 4 जुलै रोजी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला त्यामुळे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ,जोगेश्वरी सांगा, वांद्रे, दादर, किंग सर्कलसारख्या इतर भागातही मुसळधार पाऊस पडत आहे.
कोल्हापूरात जोरदार पाऊस - गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावली होती. कडकडीत उन्हानंतर बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस ( Heavy rain in various parts of Kolhapur ) झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. दुसरीकडे कोल्हापूर शहरात सुद्धा ढगांच्या गडगटासह जोरदार पाऊस ( Heavy rain in Kolhapur ) झाला. तर, एका ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज ( tree struck lightning in Kolhapur ) कोसळली होती. आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील चिले कॉलनीमध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने ( coconut tree struck by lightning ) झाडाने पेट घेतला. नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला माहिती देऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
केरळमध्ये रेड अलर्ट - केरळच्या 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान विभागाने पथनामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, थ्रिसूर, पलक्कड या जिल्ह्यांमध्ये दिवसासाठी रेड अलर्ट जारी केला. एका महिन्यात संपूर्ण कर्नाटकात पावसामुळे आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
बिहारमध्ये पावसाची विश्रांती - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. नदी-नाल्यांमध्ये पाणी आल्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये भात पेरणीला वेग आला आहे. त्याचवेळी उत्तर बिहारमध्ये नद्यांना वेग आला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाटणामध्ये 5 ऑगस्टपासून पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही. ९ ऑगस्टपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मान्सून वारे बिकानेर, शिवपूरी, रायपूर, जबलपूर, भुवनेश्वर येथून पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत जात आहेत.
गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ - यूपीसह इतर राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. पाटण्यातील गंगा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे. भागलपूरमध्येही गंगा उधळली आहे. याशिवाय कोसी, गंडक आणि बागमतीसह इतर नद्यांची अनेक भागात सातत्याने झीज होत आहे. यामुळे शेकडो कुटुंबांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.