ETV Bharat / city

Petition Against Mamata: ममता बॅनर्जी यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणावर 27 सप्टेंबर रोजी सुनावणी

author img

By

Published : Sep 6, 2022, 5:52 PM IST

पश्चिम बांग्लाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Chief Minister Mamata Banerjee ) विरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. त्यावेळी यावर राज्य सरकारला आपले भूमिका मांडण्याकरिता कोर्टाने निर्देश दिले आहे. याप्रकरणावर पुढील सुनावणी ( Hearing On Petition Against Mamata Banerjee 27 ) सप्टेंबर रोजी होणार आहे.

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee ) काही दिवसापूर्वी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीकरिता मुंबईतील भाजप कार्यकर्ते यांनी शिवडी दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली यावर ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) शिवडी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ममता बॅनर्जी यांना दिलासा दिला होता. ( Hearing On Petition Against Mamata Banerjee )

चौकशी करण्या संदर्भात आदेश देण्याची मागणी करणारी याचिका - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं मुंबईत 1 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान आणि अनादर केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्र गीताचा अपमान केल्या प्रकरणी कोर्टा समोर आईपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्या संदर्भात आदेश देण्याची मागणी करणारी याचिका भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी दाखल केली होती.

काय आहे प्रकरण - ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच राष्ट्रगीताला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या असं तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्यांनी चार ते पाच ओळी गायल्यानंतर थांबल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान केला तसेच संपूर्ण देशाचाही अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.