मुंबई - समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत क्रांती रेडकर यांनी सोशल मीडियावरील वानखडे कुटुंब विरोधात असलेले व्हिडीओ तसेच पोस्ट डिलीट करण्यात याव्यात याकरिता अर्ज केला होता. सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान वानखडे कुटुंबीयांना तत्काळ दिलासा देण्यास नकार दिला असून या अर्जावर सोशल मीडियाला आपले बाजू मांडण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
क्रांती रेडकर यांनी वानखडे कुटुंबीयांवर सोशल मीडिया गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियावर पोस्ट तथा व्हिडिओ डिलीट करण्यात यावे याकरिता याकरिता अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज तत्काळ मंजूर करण्यास नकार दिला असून सोशल मीडियाला यासंदर्भात आपले बाजू मांडण्याचे निर्देश देखील दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहेत. क्रांती रेडकर यांनी यापूर्वी सोशल मीडिया विरोधात याचिका केली आहे.
समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर ह्या सोशल मीडियांना आपल्या बाबतीत कोणतेही बदनामीकारक मजकूर अथवा पोस्ट करण्यास प्रतिबंधात्मक आदेश द्यावा ह्या मागणीची याचिका दिंडोशी कोर्टात केली होती. कार्डिलिया क्रूझ प्रकरणानंतर समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर रोज रोज सोशल मीडियावर पोस्ट होत आहे. यामध्ये प्रमुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील अनेकदा सोशल मीडियावर वानखडे कुटुंबांवर पोस्ट केले आहे. मात्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात नंतर नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट थांबले होते.
काय आहे याचिका -
क्रांती रेडकर यांच्या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया माध्यमातून वानखडे कुटुंबीयांवर खालच्या पातळीत भाषा करणाऱ्या पोस्ट गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांनी थांबवण्यात यावे आणि त्या काढून टाकाव्यात असा आदेश या सर्व सोशल मीडिया ला देण्यात यावा याकरिता याचिका दाखल करण्यात आली आहे तसेच न्यायालयाला वानखडे कुटुंबाकडून विनंती देखील करण्यात आली आहे.