मुंबई - देशभरात गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( corona virus ) आहे. हा प्रसार अद्यापही सुरू असताना मंकीपॉक्स ( Monkeypox ) या आजाराने ६० हून अधिक देशात प्रवेश केला आहे. यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क ( Government and health systems alert ) झाली आहे. देशात आढळून आलेले दोन्ही रुग्ण परदेश प्रवास करून आले असल्याने परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांवरती ( foreign travelers ) विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांची स्क्रीनिंग केली जात आहे.
परदेशातून भारतात - केरळमध्ये मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेला दुसरा रुग्ण आढळून आला ( second case of monkeypox in Kerala ) आहे. हा रुग्ण दुबईहून भारतात परतला ( Dubai Return ) होता. भारतात परतून या व्यक्तीला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. त्यानंतर आता त्याला मंकीपॉक्सची लक्षणं जाणवू लागली. मंकीपॉक्सपासून घाबरण्याचे कारण नाही. कोरोना पेक्षा कित्तेक पटीने तो कमी प्रमाणात पसरतो. तरीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सर्व देशांना सावधानतेचा इशारा याआधीच दिला आहे. गेल्या काही दिवसात जगातील २७ देशांमध्ये ( 27 countries ) मंकीपॉक्सचे जवळपास ८०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत ( More than 800 cases of monkeypox).
काय आहे मंकीपॉक्स - मंकीपॉक्स हा मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होणारा दुर्मिळ आजार आहे. मंकीपॉक्स विषाणू पॉक्सविरिडे कुटुंबातील ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील आहे. मानवांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे स्मॉलपॉक्सच्या लक्षणांसारखीच असतात, परंतू ते सौम्य असतात आणि संसर्ग झाल्यानंतर ७ - १४ दिवसांनी ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा येतो. सामान्य लक्षणांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा येणे आणि लसिका ग्रंथी सुजणे यांचा समावेश होतो.
अशी घ्या काळजी - मंकीपॉक्समुळे इतर घातक समस्या होऊ शकतात जसे की, न्यूमोनिया आणि मेंदूचे संक्रमण किंवा डोळ्यांना त्रास होणे इत्यादी आजाऱ होऊ शकतात. या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात येणे टाळा, आजारी प्राणी आणि मानव यांच्यापासून अंतर ठेवा, संक्रमित रुग्णांना स्वतंत्र खोलीत ठेवा, स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, मास्कचा आणि जमल्यास PPE कीटचा वापर करावा असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे.
खबरदारीच्या सूचना - मंकीपॉक्स विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्या सर्व ठिकाणी संशयित लोकांची स्क्रिनिंग आणि चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेशही संबंधित रुग्णालयांना द्यावेत असे स्पष्ट केले आहे.
विमानतळावर स्क्रिनिंग, विशेष कक्ष - मंकीपॉक्स हा विषाणू परदेशातून भारतात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या सूचनांप्रमाणे मुंबई विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात आहेत. त्यांची माहिती गोळा केली जात आहे. मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णाची माहिती कस्तुरबा रुग्णालयाला कळवा असे आवाहन करण्यात आले. कस्तुरबा रुग्णालयात विषाणूच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.