ETV Bharat / city

'राज्यात आता लॉकडाऊन नसून अनलॉकचीच प्रक्रिया सुरू' - health minister rajesh tope on corona

राज्यात आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मात्र, एकदम सगळं सुरू करता येणार नाही. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने शिथिलता आणत आहोत, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Jul 31, 2020, 6:38 PM IST

मुंबई - राज्यात आता लॉकडाऊन नाही तर अनलॉकचीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. कोरोना नियंत्रणाच्या कामांमध्ये राज्याने घेतलेला पुढाकार नंतरच्या काळात इतर राज्यांनी स्वीकारला आहे. तसेच राज्याचे कोरोनावरील नियंत्रण हे इतरांच्या दृष्टीने आदर्श ठरले आहे. याबरोबरच कोरोना नियंत्रणात पारदर्शकता ठेवल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमधील बेडचे अधिग्रहण केले आहे. महानगरपालिका आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त पथकाच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांचे सर्वेक्षण देखील करण्यात आले. सध्या राज्यात अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून, ही बाब समाधानाची आहे. तसेच राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर गेल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाला घाबरून जाऊ नका, मात्र काळजी घ्या, असेही राजेश टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

आता सगळं सुरू केलं पाहिजे असे मत राज ठाकरे यांनी मांडले होते. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही सहमतच आहोत. फक्त एकदम सगळं सुरू करता येणार नाही. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरू करण्यावर भर देत आहोत. एवढंच नाही तर आरोग्य विभागातल्या सगळ्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्राथमिक सेवा देणारा आमचा विभाग आहे. प्रत्येक ग्रामीण भागातील जागा भरल्या जातील. जिथे गरज आहे तिथे रुग्णालयंही वाढवणार आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मात्र, एकदम सगळं सुरू करता येणार नाही. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने शिथिलता आणत आहोत, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.