मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना प्रश्नी सविस्तर सादरीकरण झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळाला. मागील २४ तासात राज्यात १८ हजार ३९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० झाली आहे. राज्यात २ लाख ७२ हजार ४१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ३९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३३ हजार ४०७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज २० हजार २०६ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३६ टक्के आहे. आज १८ हजार ३९० नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ७२ हजार ४१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.