मुंबई - मंकीपॉक्स या आजाराची भीती संपूर्ण जगाला लागली आहे. राज्य सरकारने देखील या बाबतची खबरदारी बाळगली असून अद्याप भारतात मंकीपॉक्सची एकही रुग्ण आढळलेला नाही. या रोगाचा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिका या देशातून सुरू झाला आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये देखील या आजाराचे रुग्ण सापडतात आहेत. मात्र अद्याप मंकीपॉक्सची रोगाचे रुग्ण आपल्या देशात नसल्याचे आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ( Heath Minister Rajesh Tope On Monkeypox ) सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही - तसेच मंकीपॉक्सची विषाणू हवेतून पसरत नाही. रोग असणाऱ्या माणसाचा स्पर्श इतर माणसाला झाल्यास किंवा प्राण्याचा स्पर्श माणसाला झाल्यास हा रोग पसरतो. पुरळ येणे, ताप येणे अशी लक्षणे या रोगाची आहेत. या रोगात मृत्यूचे प्रमाण एक ते दहा टक्के एवढे असते असे मत तज्ञांचे आहे. मात्र अद्याप देशात एकही रुग्ण आढळलेला नाही. या रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या देशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे विमानतळावर स्क्रीनिंग केले जाते. त्यामुळे याबाबत नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. मात्र याबाबत कोणत्याही नागरिकाला संशय असल्यास त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
चिकनपॉक्स सारखा आहे विषाणू, मात्र घातक - तज्ज्ञांच्या मते मंकीपॉक्स विषाणू भारतात आढळणाऱ्या चिकनपॉक्स सारखा आहे. यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये मोठमोठाले दाने किंवा फोडं येतात. जो पण या विषाणूने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो, त्याला पण मंकीपॉक्स होण्याचा धोका बळावतो. हा जुना विषाणू आहे, मात्र अमेरिकेत याच्या प्रवेशाने आरोग्य संगठना सतर्क झाल्या आहेत.
2003 मध्ये अमेरिकेत केला होता कहर - 1970 मध्ये पहिल्यांदाच मनुष्यांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाचे प्रकरण समोर आले होते. आतापर्यंत या आजाराने अनेक अफ्रिकी देशांमध्ये कहर केला आहे. 2003 मध्ये या विषाणूचे अमेरिकेत अस्तित्व समोर आले होते. त्यानंतर 18 वर्षांनंतर हा आजार पुन्हा समोर आल्याने अमेरिकेचा आरोग्य विभाग थोडा अस्वस्थ झाला आहे. या सर्व वर्षांत भारतासह आशियाई देशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुष्टी झालेली नाही.
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो विषाणू - आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, संसर्ग झालेल्या प्राण्याच्या रक्ताच्या किंवा शारीरिक द्रवांच्या संपर्कात येण्याने मंकीपॉक्स होण्याचा धोका असतो. आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, हा विषाणू प्राण्यांशी संबंधित आहे, मात्र तो मनुष्यांमध्ये पसरण्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. या आजाराच्या लक्षणांविषयी सांगताना आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, पाठ आणि स्नायू दुखने याबरोबरच थकवा येतो. याव्यतिरिक्त रुग्णाच्या शरीरावर मोठ्या आकाराचे फोडपण येऊ शकतात.
हेही वाचा - Afzalkhan Tomb Controversy : छत्रपतींनी कोथळा काढलेल्या अफझलखानाच्या कबरीवरुन वाद, कडक सुरक्षा तैनात