ETV Bharat / city

राज्यात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही, मात्र पावसामुळे...; आरोग्यमंत्र्यांचे काळजी घेण्याचे आवाहन - NCP Janata Darbar Mumbai

इतर देशात मंकीपॉक्स ( Monkeypox ) रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असला तरी देशासह राज्यात एकही रुग्ण नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ( Rajesh Tope on Monkeypox ) दिली. मात्र आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Rajesh Tope
राजेश टोपे लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Jun 1, 2022, 4:58 PM IST

मुंबई - इतर देशात मंकीपॉक्स ( Monkeypox ) रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असला तरी देशासह राज्यात एकही रुग्ण नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ( Rajesh Tope on Monkeypox ) दिली. तसेच खबरदारी म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर मेडिकल स्क्रिनिंग करत असल्याचे टोपे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज जनता दरबारावेळी प्रसारमाध्यमांशी ( NCP Janata Darbar Mumbai ) बोलत होते.

सध्या जंम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नाही - राज्यातील 36 जिल्ह्यांची मुंबई आणि पुणे येथे कोरोना रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. राज्यात एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रिय रुग्ण आहेत. तर अडीच हजार रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याऱ्या संख्येमध्ये मात्र वाढ झालेली नाही, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत नाही, तोपर्यंत सध्या तरी जंम्बो कोविड सेंटर ची आवश्यकता नाही, असे टोपे म्हणाले.

पावसाळ्यामुळे काळजी घ्या - पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी पाणी साचत असल्याने साथीचे रोग ( infectious disease ) वाढतात. साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. त्यामुळे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसे ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केले आहे.

हेही वाचा - नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.