ETV Bharat / city

Aryan khan cruise case : 'या' अटीवर मिळाला आर्यन खानला जामीन - अरबाज मर्चंट

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे, हा युक्तीवाद वकिलांनी केला.

आर्यन खान
आर्यन खान
author img

By

Published : Oct 29, 2021, 5:20 PM IST

Updated : Oct 30, 2021, 11:14 AM IST

मुंबई - प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला १ लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने काल (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे थोड्याच वेळात आर्यन खान तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

aryan khan
एक लाख रुपयाच्या बॉंडवर मिळाला जामीन

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?
वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले अरबाजकडे काही आहे का याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.

क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक
क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचे सांगितले आहे. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे. जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत. त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही. त्यामुळेच हा कट आहे असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं.

'जहाजावर कोणत्याही भेटीगाठी नाही, त्यामुळे षडयंत्र म्हणता येणार नाही'
जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही, असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.

हेही वाचा - होय मी भंगारवाला! शहरातील 'या' भंगाराला भट्टीत टाकल्याशिवाय शांत बसणार नाही - नवाब मलिक

Last Updated : Oct 30, 2021, 11:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.