ETV Bharat / city

मराठी कलाकारांना मानाचा मुजरा भोवला, अभिनेता प्रसाद सुर्वे विजय पाटकर अलका कुबल प्रिया बेर्डे यांच्यासह 14 जणांना दंड - HC directs Marathi artists to pay Rs 11 lakh

पुण्यामध्ये आयोजित मानाचा मुजरा या कार्यक्रमांमध्ये अनावश्यक बोगस खर्च केला होता (Manacha Mujara expenses fraud ). याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन संचालक मंडळाला 11 लाख रुपये भरण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत (HC directs Marathi artists to pay Rs 11 lakh).

हायकोर्टाचे निर्देश
हायकोर्टाचे निर्देश
author img

By

Published : Sep 24, 2022, 3:42 PM IST

Updated : Sep 24, 2022, 7:57 PM IST

मुंबई - अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी 2012 ते 2013 मध्ये पुण्यामध्ये आयोजित मानाचा मुजरा (Manacha Mujara expenses fraud) या कार्यक्रमांमध्ये अनावश्यक बोगस खर्च केला. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन संचालक मंडळाला अकरा लाख रुपये 6 आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत (HC directs Marathi artists to pay Rs 11 lakh). त्यामुळे तत्कालीन कार्यकारणी मधील पदाधिकारी, संचालकांना मोठा झटका उच्च न्यायालयाने दिला आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष अभिनेता प्रसाद सुर्वे, अभिनेता विजय पाटकर, मराठी अभिनेत्री अलका कुबल, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. या सर्वांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यात 2012-2013 दरम्यान मानाचा मुजरा हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी या कार्यक्रमासाठी तत्कालीन संचालकांनी 52 लाख रुपये खर्च केले होते. सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता मागितली होती. त्यावेळी सभासदांनी आक्षेप घेतला होता. जे खर्च चुकीच्या पद्धतीने झाले आहेत त्याची वसुली झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

चित्रपट महामंडळाच्यावतीने 10 वर्षांपूर्वी पुण्यात मानाचा मुजरा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी तत्कालिन संचालकांनी बोगस खर्च दाखवून रक्कम लाटल्याचा आरोप सभासदांनी केला होता. त्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी 10 लाख 78 हजार रुपये तातडीने भरण्याचा आदेश दिला. पण याला संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण त्यांची याचिका फेटाळून लावत ती रक्कम सहा आठवड्यात भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अनेक संचालकांचे सभासदत्व रद्द केले आहे.

ज्यांच्याकडून ही रक्कम भरून घ्यावी असा आदेश दिलेल्यामध्ये माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, मिलींद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, अलका कुबल, प्रिया बेर्डे, अनिल निकम, संजीव नाईक, सतीश रणदिवे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण व व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांचा समावेश आहे.

Last Updated : Sep 24, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.