मुंबई - मुंबईत दादर स्थानकावर ( Dadar Station Of Central Railways Mumbai ) रेल्वे सुरक्षा दलाच्या सीआयबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सीआयबी पथकाने ( Crime Intelligence Branch ) हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला असून, ६७.४४ लाखांची रक्कम जप्त केली ( Cib Recover Rs Rs.67.44 Lakh ) आहे. याप्रकरणी सीआयबी पथकाने एकास अटक केली ( Cib Arrested Hawala Racket ) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीआयबीने सापळा रचला होता. त्यानुसार कारवाई करत हवालाची रक्कम घेऊन जाणाऱ्या सेंधाराम खुमाराम ( अमरावती ) याला अटक केली. यावेळी त्याच्याकडे 67 लाख 44 हजार 500 रुपयांची रक्कम आढळून आली.
रेल्वेच्या सीआयबी पथकाला एक जण हवालाची रक्कम देण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कॉन्स्टेबल नीळकंठ गोरे, विनोद राठोड आणि विजय पाटील यांनी सापळा रचला होता. तेव्हा फलाट क्रमांक 1 वर थांबलेल्या सेंधाराम खुमाराम अटक केली. त्याच्याकडील 67 लाख 44 हजार 500 रुपयांची रक्कम पथकाने जप्त केली आहे. याप्रकरणी सीआयबी पुढील तपास करत आहे.