मुंबई - मुंंबई पोलिसांनी चरस तस्कराला अटक केली आहे. आरोपी नेपाळवरून चरसची तस्करी करून ती मुंबई आणि उपनगरांमध्ये विकत होता. आरोपीकडून एक कोटींची चरस जप्त करण्यात आली आहे.
आरोपीकडून तीन किलो चरस जप्त
मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सुरज जाधव नावाच्या व्यक्तीला चरस तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 56 लाखांची चरस जप्त करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आज पुन्हा आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. किशन हरिप्रसाद गौड उर्फ साठे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन किलो चरस जप्त करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी मुजफ्फरनगरमध्ये चरस तस्करी प्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली होती. आरोपींचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले होते. आरोपी नेपाळहून चरसची तस्करी करून भारतात विकत होते.