ETV Bharat / city

पिके करपल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या - हर्षवर्धन पाटील

दुसरीकडे शैक्षणिक शुल्कमाफीच्या संदर्भात सरकारने अधिसूचना काढली. परंतु ही अधिसूचना कागदावर ठरली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना शुल्क भरल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जात नाही.

हर्षवर्धन पाटील
author img

By

Published : May 10, 2019, 1:59 PM IST

मुंबई - राज्यात मागील वर्षभरात शेतकऱ्यांची संपूर्ण पिके करपून गेलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची ३१ मार्चपर्यंतची संपूर्ण कर्जे माफ करावीत, अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज केली. दुष्काळग्रस्त भागातील कामे पूर्ण करण्यासाठी सरकार पाठपुरावा करत नसल्याची त्यांनी टीका केली. मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसची बैठक सुरू होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्यात भयंकर दुष्काळ निर्माण झाला आहे. त्यासाठीच्या कामाचा पाठपुरावा सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून घेतला जात नाही. यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. सरकारने कर्जमाफी संदर्भात काढलेल्या पहिली अधिसूचना ही २०१६-१७ पर्यंत घेतल्या कर्जासाठी होती. त्यात वाढ करून ३१ मार्च २०१९ पर्यंत राज्यातील दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हर्षवर्धन पाटील

केवळ १८ कोटींची कर्जमाफी - हर्षवर्धन पाटील
शेतकऱ्यांची ३८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याने ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सरकारने सांगितले होते. तसेच ६० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याचे सांगितले होते. परंतु तसे काही झालेले नाही. तेव्हा १८ कोटींची कर्जमाफी झाल्याचे चित्र आतापर्यंत दिसून आले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील कामांसाठी आचार संहितेची अडचण नाही - पाटील
दुसरीकडे शैक्षणिक शुल्कमाफीच्या संदर्भात सरकारने अधिसूचना काढली. परंतु ही अधिसूचना कागदावर ठरली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना शुल्क भरल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जात नाही. तरी सरकार मात्र त्यावर कारवाई करत नाही. तर त्या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या निर्णयाला निवडणूक आचार संहितेमध्ये अडकविता येत नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागात कामे सुरू करण्यासाठी कुठली अडचण नाही. परंतु त्यासाठीचा पाठपुरावा घेतला जात नाही. तिजोरीत पैसे असताना जिल्हाधिकाऱ्यांना दिले जात नाहीत, असा आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर केला.

Intro:ज्या शेतकऱ्यांची पिके जळाली त्यांना मार्चखेरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्या

Body:ज्या शेतकऱ्यांची पिके जळाली त्यांना मार्चखेरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्या

मुंबई, ता. 10 :

राज्यात मागील वर्षभराच्या शेतकऱ्यांची संपूर्ण पिके जळून गेलेली आहेत त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज केली.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसची बैठक सुरू होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात भयंकर दुष्काळ दुष्काळ निर्माण झालेला असताना त्यासाठीच्या कामाचा फोलोप सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून घेतला जात नाही यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेले आहेत. सरकारने कर्जमाफी संदर्भात काढलेल्या पहिला जीआर हा 2016-17 पर्यंत होता. त्यात आता वाढ करुन तो 31 मार्च 2019पर्यंत राज्यातील दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली. सरकारने 38 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचे, 89 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे सांगितले होते आणि 60 लक्ष शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सांगितले होते,परंतु तसे काही झालेले नाही. तेव्हा 18 कोटीची कर्जमाफी झाले असल्याचे चित्र आतापर्यंत दिसून आले आहे. दुसरीकडे शैक्षणिक शुल्कमाफी च्या संदर्भात सरकारने जीआर काढला, परंतु हा जीआर कागदावर ठरलेला आहे. कोणत्या विद्यार्थ्यांना शुल्क भरल्याशिवाय परीक्षेला बसू दिले जात नाही. तरी सरकार मात्र त्यावर कारवाई करत नाही. तर त्या ऑक्टोबरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाला कोड ऑफ कंडक्ट मध्ये तर अडकवता येत नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागात कामे सुरू करण्यासाठी साठी कुठली अडचण नाही. परंतु त्यासाठीचा फॉलोप घेतला जात नाही. तिजोरीत पैसे असताना जिल्हाधिकाऱ्यांना दिले जात नाहीत असा आरोपही हर्षवर्धन पाटील यांनी केला.

Conclusion:ज्या शेतकऱ्यांची पिके जळाली त्यांना मार्चखेरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी द्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.