मुंबई - एनसीबीचे (ncb) विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त (mumbai police commissioner) हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये सुमारे 35 मिनिटे बैठक झाले समीर वानखेडे यांना जात वैधता प्रमाणपत्राशी संबंधित चौकशीसंदर्भात बोलावण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई पोलिसांची एसआयटी (SIT) क्रूझ ड्रग्स (cruise drug case) प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर आणखी एक टीम वानखेडे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही ड्रग्स (Drugs) प्रकरणासंदर्भात अनेक गोष्टींचा संदर्भ देत वानखेडेवर खंडणीचा आरोप केला आहे. तसेच वानखेडे यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मात्र, वानखेडे यांना अनुसूचित जातीच्या कोट्यातून सरकारी नोकरी मिळाली जी मुस्लीम व्यक्तीला मिळू शकत नाही. ही फसवणूक आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.
हे ही वाचा -देवेंद्रजी स्वप्न बघायचं बंद करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तुम्ही नाही.. मलिकांचा फडणवीसांवर घणाघात