ETV Bharat / city

राज ठाकरे डिसेंबरला अयोध्येला येणार, हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावणार - गुरु माँ कांचन गिरी - राज ठाकरेंची गुरु माँ कांचन गिरी यांनी घेतली भेट

अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज ठाकरेंना करण्यात आली आहे. राज ठाकरे हे डिसेंबरला अयोध्येला येणार असल्याचे कांचन गिरी यांनी सांगितले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्या अगोदर कांचन गिरी, जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

गुरु माँ कांचन
गुरु माँ कांचन
author img

By

Published : Oct 18, 2021, 3:23 PM IST

Updated : Oct 18, 2021, 4:12 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरु माँ कांचन गिरी यांनी कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज ठाकरे आणि यांच्यामध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चा झाली. राज यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले आहेत. अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज ठाकरेंना करण्यात आली आहे. राज ठाकरे हे डिसेंबरला अयोध्येला येणार असल्याचे कांचन गिरी यांनी सांगितले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्या अगोदर कांचन गिरी, जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

गुरु माँ कांचन गिरी यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट
'मराठी माणसाप्रमाणेच भावना ठेवावी'

राज ठाकरे यांच्याबरोबर हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भेट झाली. तसेच परप्रांतीयाबद्दल देखील राज ठाकरे यांनी मराठी माणसाप्रमाणेच भावना ठेवावी तसेच परप्रांतीयांना सांभाळून घ्या. अयोध्येला एकदा आपल्या कार्यकर्त्यांसह भेट द्या व हिंदूराष्ट्र उभारणीसाठी आपले योगदान द्या, अशी चर्चाही या भेटी दरम्यान झाली असल्याचे कांचन गिरींनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरुन टीकास्त्र डागले आहे.

हिंदुत्वाचा विषय होऊ शकतो निवडणुकीचा मुद्दा?

काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या विषयावरून आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. मंदिर आंदोलन असेल व इतर आंदोलन असतील यामध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलत नवी भूमिका समोर आणली होती. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचे महंताना आश्वासन दिले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हिंदुत्वाच्या विषयावर निवडणुका लढवण्याचे संकेत आहेत. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती देखील होऊ शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - गुरु मॉं कांचन गिरी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला

Last Updated : Oct 18, 2021, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.