मुंबई : उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार ( Milind Narvekar Will Leave Uddhav Thackeray Side ) असून, ते शिंदे गटात जाणार असल्याचा गौप्यस्फोट ( Milind Narvekar to Quit Shiv Sena ) करणारी माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ( Water Supply Minister Gulabrao Patil Secret Blast ) एका सार्वजनिक कार्यक्रमात ( Milind Narvekar Join Shinde Group ) दिली. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार आम्हाला येऊन मिळतील. आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच केले होते. त्याला अनुसरून गुलाबराव पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आता शिवसैनिकांच्या नजरा नार्वेकरांच्या हालचालीवर असणार एवढे मात्र नक्की.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती नार्वेकरांची दोनदा भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील १५ दिवसांत मिलिंद नार्वेकर यांच्या दोनदा घरी जाऊन भेट घेतली होती. त्याच वेळेला नार्वेकर हे शिवसेनेमधून फुटणार, अशी चर्चा रंगली होती. शिवसेना कोणाची याबाबत रस्त्यावरचा संघर्ष तर सुरू आहेच, त्याबरोबर दिल्लीत न्यायालयीन संघर्षदेखील सुरू आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे आता शिंदे गटात जाणार असल्याची धक्कादायक माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल एका सार्वजनिक कार्यक्रमात विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
नार्वेकरांच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण : नार्वेकरांच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी गोरेगावात जो विभाग प्रमुखांचा मेळावा घेतला होता. तेव्हा रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती होते आणि विविध प्रकारच्या फायली त्यांच्याकडे होत्या. म्हात्रे आता सक्रिय झाल्यामुळे मिलिंद नार्वेकर हे जाणार, अशी शक्यता त्याच वेळेला वर्तवली गेली होती. गुलाबराव पाटील म्हणतात ते खरं होतंय की नाही ते काही काळातच समजेल. तसे घडले तर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना तो धक्का ठरेल.
कोण आहेत मिलिंद नार्वेकर : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर साधा शिवसैनिक होते. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला गेला. म्हणून नव्या वॉर्डचे शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. त्यावेळी उद्धव ठाकरे स्वत:च तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते. उद्धवनी त्याला विचारलं, फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद पटकन उत्तरला, तुम्ही सांगाल ते. आधी मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचा पीए बनला. नंतर सुरू झाली त्यांची राजकीय कारकीर्द.
धुळे येथे दसरा मेळावा संदर्भात शिंदे गटाची आयोजित मेळावा : धुळे व नंदूरबार येथील शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, आपल्या लोकांची आपणच सुपारी घेऊन शिवसेना संपवली, असे म्हणत पडलेल्या उमेदवारांबद्दल तिकीट मॅनेज केल्याचा आरोपदेखील यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लावला. तसेच, चरणसिंग थापा ज्याने आयुष्यभर बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली, तोदेखील यांना सोडून आला आहे. त्यामागे आता मिलिंद नार्वेकर देखील येत आहेत, असे म्हणत मिलिंद नार्वेकर हेदेखील उद्धव ठाकरे शिवसेनाला राम राम ठोकणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेतील उरलेले आमदारदेखील शिंदे गटात : त्याचबरोबर धनुष्यबाण आपल्याकडे येताच त्यांच्याकडे उरलेले 15 पैकी पाच आमदारदेखील दिसणार नाहीत. ते फक्त आपल्याकडे 'तिरकमान कब आ रहा' याची वाट बघत असल्याचे सांगितले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेतील उरलेले आमदारदेखील शिंदे गटात येणार असल्याचे भाकीत व्यक्त केले आहे.
मेळावा प्रसंगी विरोधकांचा घेतला समाचार : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील धुळ्यात आले होते. यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी 50 खोके बोलणाऱ्यांविरोधात चांगलाच समाचार घेतला आहे. दसरा मेळाव्यात संजय राऊत आले, तर त्यांना टीका करता येईल का हे सर्वात महत्त्वाचे आहे. आतमध्ये नवाब मलिक यांनी त्यांना काय सांगितले, हे माहिती नाही, असा खोचक टोलाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोलताना त्यांना लगावला आहे.
दसरा मेळावा ऑफलाईन झाला पाहिजे, मग मजा बघा : उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा ऑनलाईन झाला पाहिजे, अशी टीका विरोधकांकडून होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, मेळावा ऑनलाईन नाही ऑफलाईनच झाला पाहिजे मजा येईल, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केली आहे.
आमदार, खासदार ज्यांच्याकडे जास्त त्यांचाच धनुष्यबाण : न्यायप्रविष्ठ असलेल्या धनुष्य कुणाचा यावर बोलताना ज्याच्याकडे जास्त आमदार ज्याच्याकडे जास्त खासदार, ज्यांच्याकडे जास्त पक्षाचे लोक असतात त्यांना चिन्ह मिळत, आम्हाला खात्री आहे धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंचा कोणावरच विश्वास नाही : त्यांचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. हाबू हाबू करून सर्वांना ते पळवत असल्याची टीका यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. चरण सिंग थापा ज्याने बाळासाहेबांची अखेरपर्यंत सेवा केली तोदेखील यांना सोडून गेला आहे. गुलाबराव पाटलाला तरी मंत्रिपद हवे होते म्हणून पळाला. परंतु, चरण सिंग थापाला काय एमएलसी व्हायचं होते का म्हणून ते यांना सोडून गेले, असा प्रश्नदेखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही आताच कसे खोकेवाले झाले, पूर्वी गरीब होता का... ज्याप्रमाणे गुंगीच औषध दिल्यानंतर लहान मुलांना उचलले जाते त्या प्रकारे आम्ही जेव्हा तुमच्या सोबत होतो, तेव्हा खुद्दार होतो आता गद्दार झालो. जेव्हा तुमच्या सोबत होतो तेव्हा गरीब होतो, आता खोकेवाले झालो. ही जनता आहे, खोके खोके काय करता जनता कोरोनाला विसरून गेली. खोकेदेखील विसरतील, खोक्याच्या भरोशावर मत मिळत नाही, तर विकाऊ असतो तर आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले नसते. सांगून छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालो आहे, असे म्हणत 35 वर्षे रक्ताचे पाणी केले आहे. आणि असे असूनदेखील आपण जर आम्हाला गद्दार म्हणत असाल तर याचे उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये देईल, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना आदेशावर चालते आणि त्याचे पालन आम्ही केले : शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि आम्हीदेखील उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आदेशाचे पालन केले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय काही काळानंतरून चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस निधी देत नसल्यामुळे आमदारांना पुन्हा निवडून येण्याबाबत साशंकता वाटू लागल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शिवसेना वाचवण्यासाठीघेतला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.