ETV Bharat / city

आवाहन करूनही जनता प्रतिसाद देत नाही - अस्लम शेख - कोरोना नियमांबद्दल बातमी

मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन करूनही जनता प्रतिसाद देत नाहीत. यामुळे नाईलाजास्तव कारवाई कारवाई करावी लागत असल्याचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले.

Guardian Minister Aslam Sheikh said that people do not respond to appeals Said
आवाहन करूनही जनता प्रतिसाद देत नाही- अस्लम शेख
author img

By

Published : Feb 23, 2021, 5:28 PM IST

Updated : Feb 23, 2021, 6:58 PM IST

मुंबई - राज्यासह मुंबईमध्ये कोरोना वाढत आहे. रुग्णाची वाढती संख्या पाहता कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच महानगरपालिकेकडून करण्यात आले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री तसेच महानगरपालिकेच्या अहवानाकडे जनता गांभीर्याने घेत नसून नाईलाजास्तव आम्हाला कारवाई करावी लागत आल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले. गेल्या काही आठवड्यांआधी मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. म्हणूनच जनतेला नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या आवाहनाला जनतेकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. म्हणूनच मंगल कार्यालय, लग्न सोहळे आणि नाईट क्लब किंवा इतर जे काही कार्यक्रम असतील त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.

आवाहन करूनही जनता प्रतिसाद देत नाही - अस्लम शेख

अनलॉक नंतर हळू हळू सेवा राज्य सरकारकडून सुरू करण्यात आल्या. मात्र, या सेवा सुरू झाल्यानंतर जणू काही कोरोना आता गेला आहे, या अविर्भावात जनता वावरत आहे. यामुळे कोरोनाचा पुन्हा एकदा शिरगाव पाहायला मिळतोय. म्हणूनच आता नियम काटेकोरपणे पालन केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेकडून नियमांचे करण्यात आले नाही तर लोकं शिवाय पर्याय नाही असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केले. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पोहरादेवी देवस्थानी जमलेले लोकांवर कारवाई -

संजय राठोड आज पोहरादेवी इथे पोहचेल असता कोरोनाने सर्व नियम धाब्यावर बसून संजय राठोड समर्थक तिथं जमले. मात्र, त्या समर्थकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे स्पष्टीकरण मंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्ष आणि नेत्यांना आवाहन केल्या नंतर सर्वांनी आपले कार्यक्रम रद्द केले आल्याच देखील अस्लम शेख यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला सर्वांकडून प्रतिसाद दिला जात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Last Updated : Feb 23, 2021, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.