मुंबई - पंचवीस वर्ष राज्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळेस शिवसेनेची कोणतीही गोष्ट भाजपला खटकली नाही. मात्र, आता भाजपच्या हातातून सत्ता गेल्यामुळे त्यांचे भान हरपले असल्याचा चिमटा अस्लम शेख यांनी काढला.
हेही वाचा - शासनाचा आज केव्हा उजाडणार? शिक्षकांना लोकल प्रवासास अजूनही परवानगी नाही
शिवसेना भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. राम मंदिर जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर 'फटकार' आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राम मंदिराबाबत शिवसेनेने भाजपला प्रश्न विचारल्यामुळे भाजपला मिरची का झोंबली? असा सवाल मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केला.
कोविड परिस्थितीत आंदोलन करण्याची गरज होती का? - शेख
तसेच, कोविड 19 ची परिस्थिती असताना देखील भारतीय जनता पक्षाला अशाप्रकारे आंदोलन करण्याची गरज होती का? असा सवालही असलम शेख यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. आंदोलनादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोपही असलम शेख यांनी केला.
हेही वाचा - शिवसेना नेत्या श्रद्धा जाधव यांच्यासह सहा जणांवर माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल