ETV Bharat / city

Gram Panchayat Election results : ग्रामपंचायत निवडणुक ; उद्धव ठाकरेंची शिवसेना चौथ्या क्रमांकावर का गेली ? - Uddhav Thackeray Shiv Sena

राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले (Grampanchayat Election 2022) आहेत. सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात भावनिक जनाधार उभा राहील, अशी चर्चा असताना निकालानंतर मात्र शिवसेना हा चौथ्या क्रमांकावर असलेला पाहायला (Shiv Sena fall to fourth position) मिळाला.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Sep 20, 2022, 1:20 PM IST

मुंबई - राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले (Grampanchayat Election 2022) आहेत. सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात भावनिक जनाधार उभा राहील, अशी चर्चा असताना निकालानंतर मात्र शिवसेना हा चौथ्या क्रमांकावर असलेला पाहायला (Shiv Sena fall to fourth position) मिळाला. मात्र ग्रामपंचायत निवडणूक नाही, तर विधानसभेच्या निवडणुक निकालानंतर खरे चित्र समोर येईल, असे संकेत शिवसेनेकडून देण्यात आले आहेत.

६०८ ग्रामपंचायतीत शिवसनेला फक्त 38 जागा - १७ जिल्ह्यातील ६०८ ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून या ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. तर त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला जवळपास 86 जागा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळाले आहेत. राज्यामध्ये झालेल्या सत्तांतर नाट्यनंतर पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकांकडे सर्व राज्याचे लक्ष लागलं होतं. या निवडणुकीतून जनतेचा कौल नेमका कोणाला मिळतोय. खास करून शिवसेनेसोबत सामान्य जनता उभी राहणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं मात्र या निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर पाहायला मिळते. यामध्ये शिंदे गटाला 41 तर शिवसेनेला 38 ग्रामपंचायत वर विजय मिळाला (Maharashtra Gram Panchayat Election Result) आहे.

शिवसेनेला जनतेची भावनिक साथ नाही ? महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. पक्षातील 40 आमदार बाजूला घेऊन जात भाजपासोबत संधान साधत राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आणलं. यामुळे मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागल्यानंतर, शिवसेनेकडून जनतेला भावनिक आवाहन करण्यात आलं होतं. स्वतः माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत, या दौऱ्यांमधून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी कशाप्रकारे शिवसेनेशी गद्दारी केली ? या गद्दारीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन केलं.

साध्या आणि सरळ व्यक्तिमत्व असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाने षडयंत्र केले असल्याचा आरोप सातत्याने आदित्य ठाकरे यासोबतच शिवसेनेकडून केला जातोय. त्यामुळे या सत्तांतरानंतर झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत शिवसेनेला जनतेकडून चांगली साथ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सध्या निवडणुकीनंतर जे आकडे समोर येत आहेत, त्यानुसार शिवसेनेला हवं तसं यश मिळालेलं दिसत नाही. केवळ 37 ते 38 ग्रामपंचायतीवर शिवसेनेला आपला भगवा झेंडा लावता आलेला आहे. त्यामुळे सत्तांतर उद्धव ठाकरे यांच्या मागे जनतेचा भावनिक पाठिंबा मिळेल अशी जी आशा होती. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका या नेहमीच स्थानिक पातळीवर आणि वैयक्तिक संबंधांवर लढवल्या जातात. त्याच माध्यमातून मतदानही केलं जातं. म्हणून या निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेसोबत जनतेची साथ नाही, असा अर्थ काढणं चुकीचा (Gram Panchayat Election results) आहे.

विरोधक केवळ ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यावर आरोप करत आहेत. पण येणाऱ्या निवडणुका खासकरून 2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमधून जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल असं मत शिवसेनेच्या उपनेत्या संजना गाडी यांनी व्यक्त केल आहे. तसेच शिवसेनेत पडलेली सध्या सर्वात मोठी फूट याचाही परिणाम या निकालांवर पाहायला मिळतोय. सत्ता आणि पैशाच्या जोरावर सध्या सत्ताधारी पक्ष निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना सत्ताधाऱ्यांना नक्की धडा शिकविला, असा इशाराही संजना घाडी यांनी दिला आहे.

या निकालांमुळे काम करण्याची प्रेरणा मिळेल - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायती निवडणुकीच्या निकालावर समाधान व्यक्त केल आहे. सरकार म्हणून आपण चांगलं काम करत आहे, त्याचीच पोहचपावती या निकालाच्या माध्यमातून जनतेने आपल्याला दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवरून आपण घेतलेला निर्णय जनतेला पटला असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी, हीच भीती व्यक्त केली होती महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेला पोखरत आहे. शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसने घातला असल्याची भीती व्यक्त केली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जे निकाल समोर आले आहेत, त्यानुसार ती भीती खरी ठरत असल्याचा टोला भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला (Maharashtra Politics) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.