मुंबई - नौरोसजी वाडिया रुग्णालयाला अनुदान लवकरात लवकर मिळावे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार नियमित मिळावे, अशा विविध मागण्या वाडियाचे कामगार करत आहेत. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अन्यथा मनसेने हात जोडलेले आहेत, ते त्यांना खोलावे लागतील, असा इशारा रुग्णालयाबाहेरील आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा... 'वाडिया'ला जीवनदान द्या; कर्मचारी आणि कामगार युनियनचे रुग्णालयाबाहेर धरणे
शर्मिला ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेतर्फे वाडिया रुग्णालयाच्या आंदोलनाला भेट दिली. तसेच त्यांनी या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान रुग्णालयाचे डीन डॉ. मिनी बोधनवाला यांनी रुग्णालय बंद होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा... 'आप'च्या प्रचारगीतामध्ये मनोज तिवारी, भाजपने मागितली 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई
शर्मिला ठाकरे यांनी बोलताना, रूग्णालयाबाबत मनसेने देखील वारंवार वाडियासाठी पालिका आणि राज्य शासनाला पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाने फक्त आश्वासन दिली. त्याचे पुढे काहीच झाले नाही. मात्र, आता हे रुग्णालय वाचले पाहिजे. नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही हात जोडत आहेत. तसेच आम्हाला आक्रमक भूमिका घ्यायला भाग पाडू नका, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. या रुग्णालयाला अनुदान द्यावे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने अनुदान मिळवून देऊ, असा इशारा मनसेने दिला आहे.
हेही वाचा... 'त्या' पुस्तकावर तत्काळ बंदी घाला; अन्यथा....., संभाजी ब्रिगेडचा इशारा
वाडिया रुग्णालय हे मुंबई तसेच राज्यभरातील गरीब मुलांच्या उपचारासाठी ओळखले जाते. मात्र, सरकार रुग्णालयाला अनुदानात देण्यास विलंब लावत आहे. हा रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप, येथील कर्मचारी आणि कामगार युनियन करत आहेत.