मुंबई: दहा महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष पद रिक्त आहे. हे पद भरण्यासंदर्भात आघाडी सरकारमध्ये अनेकदा खलबते झाली. मात्र गुप्त मतदान पद्धतीच्या प्रक्रियेमुळे राज्य सरकारची कोंडी झाली होती. अखेर गुप्त मतदान प्रक्रियेचे मतदानाकरिता बदल करण्यात आला. हिवाळी अधिवेशनात तसा ठराव मंजूर करून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यावर आघाडी सरकारमध्ये एकमत झाले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, अमीन पटेल आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे आघाडीवर आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेच्या कायद्यानुसार अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांची भूमिका निर्णायक असते. राज्यपाल अध्यक्ष निवडीची तारीख निश्चित करतात. त्यानंतर अध्यक्ष पदाच्या निवडीचा निर्णय घेतला जातो. हिवाळी अधिवेशन यंदा दोन आठवड्याचे आहे. दुसऱ्या आठवड्यात दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी आहे. याकाळातच उमेदवार निवडावा लागणार आहे. अन्यथा उमेदवार निवड पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारची धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेणार आहेत. राज्यपाल यावर सकारात्मक भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यपालांना साकडे - Governor's consent
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (winter session of Legislature) दुसऱ्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवड (Election of Assembly Speaker) होणार आहे. या निवडीला राज्यपालांची संमती (Governor's consent) मिळवण्यासाठी विकास आघाडी (Maha Vikas Aghadi government ) सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी जोर लावला आहे. आज संध्याकाळी आघाडीतील नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.